MS Dhoni Retirement Date : महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यावसायिक कार्यक्रमावेळी बोलताना धोनीने आपल्या निवृत्तीचे गुढ उकलले. महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला एका ओळीच्या ट्विटने आपली देदिप्यमान कारकीर्द संपलवी होती. मात्र नुकत्याच केलेल्या वक्तव्यानुसार धोनीने या दिवशी निवृत्तीचा निर्णय घेतला नव्हता.
2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये 10 जुलै 2019 ला मँचेस्टरवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनल सामना झाला होता. अटीतटीच्या सामन्यात धोनी ऐन मोक्याच्यावेळी धावबाद झाला. त्यानंतर भारताचा पराभव झाल अन् वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले.
धोनीने त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता धोनीने आपल्या निवृत्तीबाबत प्रत्येक गोष्टीचा उलगडा केला. तो म्हणाला, 'ज्यावेळी तुम्ही खूप थोड्या अंतराने हरता त्यावेळी भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते. माझ्यासाठी तो भावनिक क्षण हा ज्यावेळी मी भारतासाठी शेवटचा सामना खेळला त्यावेळीचा होता. मी जवळपास एका वर्षानंतर निवृत्ती जाहीर केली मात्र खरं सांगू का मी त्याच दिवशी निवृत्त झालो होतो.'
'आम्हा क्रिकेटपटूंना एक विशिष्ट मशिन देण्यात आली होती. मी ज्यावेळी ते मशिन देण्यासाठी ट्रेनरकडे जायचो त्यावेळी तो मला ते पर देत तू हे ठेव असं म्हणायचा. माझ्या मनात विचार यायचा की मी याला कसं सांगू की आता मला याची काही गरज राहिलेली नाही.'
देशाची 15 वर्षे सेवा केल्यानंतर धोनीने निवृत्तीच्या निर्णयापर्यंत येताना मनात काय सुरू होतं हे देखील सांगितले. तो म्हणाला, 'तुमच्या भावना टिपेला पोहचलेल्या असतात. गेल्या 12 ते 15 वर्षात तुम्ही फक्त एकच गोष्ट केलेली असते ती म्हणजे क्रिकेट खेळण! आता तुम्हाला तुमच्या देशाचं प्रतिनिधित्व करता येणार नाहीये.
'खूप लोकांमधून फक्त काही लोकांनाच ही संधी मिळते. खेळाडूंना ती मिळते. तुम्ही कोणता खेळ खेळता हे महत्वाचं नसतं तर तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत असता हे महत्वाचं असतं. मग ते राष्ट्रकुल असो की ऑलिम्पिक. जेव्हापासून मी क्रिकेट सोडलं आहे. मला आता देशाचं प्रतिनिधित्व करता येणार नाही. मी देशाचा सन्मान वाढवण्यासाठी आता काही करू शकत नाही. या सर्व विचारांच काहूर मनात माजलं होतं.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.