MS Dhoni Retirement on This Day  
क्रीडा

MS Dhoni : धोनीची तीन वर्षांपूर्वीची 7 वाजून 29 मिनिटांची 'ती' पोस्ट अन् रडले करोडो भारतीय...

Kiran Mahanavar

MS Dhoni Retirement on This Day : 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्यदिन. ज्या दिवशी संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उत्साह साजरा करत होता. 2020 मध्येही हीच परिस्थिती होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही देशात या दिवसाचा उत्साह कमी झाला नव्हता. संपूर्ण देश जल्लोषात बुडाला होता पण संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांची ती पोस्ट समोर आली आणि संपूर्ण देश हादरून गेला. सुखाचे रूपांतर दु:खात झाले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले, काय झाले याची कोणालाच माहिती नव्हती. ही पोस्ट भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीची होती. या पोस्टसह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

धोनीने त्याच्या इंस्टाग्रामवर ही पोस्ट टाकताच. देशातील वातावरण अस्वस्थ झाले. त्यावेळी धोनी त्याची आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जसोबत यूएईला रवाना झाला होता.

धोनीने तेच केले ज्यासाठी तो ओळखला जातो. म्हणजेच ज्या कामाची कोणालाच अपेक्षा नव्हती. धोनीने एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले तेव्हाही त्याने कोणाला सुगावा लागू दिला नव्हता आणि अचानक विराट कोहलीला कर्णधारपद दिले.

असेच धोनीने निवृत्तीच्या वेळी केले. कोणाचीही अपेक्षा नसताना त्याने शांतपणे एक पोस्ट टाकली आणि निरोप घेतला. धोनीने पोस्टमध्ये लिहिले की, “या प्रवासात तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मला 19:29 पासून निवृत्त समजा. धोनीने या पोस्टसोबत एक व्हिडिओही टाकला होता ज्यामध्ये टीम इंडियासोबतच्या त्याच्या प्रवासाचे फोटो होते.

आजही धोनी लोकांच्या मनावर राज्य करतो. धोनी हा आतापर्यंतचा एकमेव कर्णधार आहे ज्याने टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी-20 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्याच वेळी 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

नव्या खेळाडूंशी कसे वागायचे आणि वरिष्ठांचा आदर कसा करायचा हे धोनीला माहीत होते. सौरव गांगुली त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असताना धोनीने त्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी गांगुलीला कर्णधारपदाची जबाबदारी दिली. सचिन तेंडुलकर शेवटचा कसोटी सामना खेळत असताना धोनीने त्याच्यासाठी सँडऑफ प्लॅन बनवला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फक्त आयपीएल खेळतो, निवृत्तीनंतर चेन्नईने त्याच्या नेतृत्वाखाली दोनदा आयपीएल जिंकले आहे. या वर्षीही धोनीने चेन्नईला त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल जिंकून दिले. धोनीची फॅन फॉलोइंग अजूनही कमी झालेली नाही. तो कुठेही गेला तरी चाहते त्याच्यासाठी वेडे होतात.

धोनीने भारतासाठी 90 कसोटी सामने खेळले आणि 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या ज्यात सहा शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने भारतासाठी 350 एकदिवसीय सामने खेळले आणि 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या. धोनीने वनडेमध्ये 10 शतके आणि 73 अर्धशतके केली आहेत. 98 टी-20 सामने खेळले असून 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economist Bibek Debroy Passed Away: अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन; ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष होते

आताच्या दिवाळीत जुनी मजा नाहीच... कुणाला गावी जायची घाई तर कुणाला फटाके उडवायची, कलाकारांनी सांगितल्या आठवणी

Tesla Job: पुण्याच्या इंजिनियरने इलॉन मस्कला पाठवले 300 अर्ज आणि 500 ​​ईमेल; शेअर केला ड्रीम जॉब मिळवण्याचा संघर्ष

Diwali Festival 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त घरोघर अभ्यंगस्नान; आज लक्ष्मीपूजन

Mumbadevi Assembly Constituency: ''इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजनल माल आहे'' अरविंद सावंतांची जीभ घसरली; शायना एनसींचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT