MS Dhoni Video SAKAL
क्रीडा

MS Dhoni : 'माय लव्ह...' साक्षी तिच्या शेजारी होती तरी एअर होस्टेसने धोनीला दिली चिठ्ठी अन्...

Kiran Mahanavar

MS Dhoni Video : चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2023 चे विजेतेपद मिळाल्यानंतर कर्णधार एमएस धोनी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धोनी पत्नी साक्षीसोबत फ्लाइटने प्रवास करत होता. फ्लाइटमध्ये तो कँडी क्रश खेळण्यात व्यस्त होता. प्रत्यक्षात एका एअर होस्टेसने व्हिडिओ गेममध्ये मग्न असलेल्या धोनीसमोर चॉकलेटने भरलेला ट्रे ठेवला. चॉकलेट पाहून भारताचा माजी कर्णधार धोनी हसायला लागला. त्याने ट्रेमधून एकच चॉकलेट घेतले आणि बाकीचे परत केले.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की होस्टेस त्याच्याकडे आणखी चॉकलेट्स देत होती, परंतु धोनीने नकार दिला. हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

धोनीला भेटल्यानंतर एअर होस्टेसने या भेटीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, मला विश्वास बसत नाही की ती अशी धोनीला भेटली. तो तिचा ऑल टाइम क्रश आहे.

धोनीला टॅग करत निकिताने पुढे लिहिले, माझे प्रेम. धोनी एक अद्भुत व्यक्ती आहे यात शंका नाही. तो खूप नम्र आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार धोनीने आपल्या हसण्याने सर्वांना वेड लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT