रवी शास्त्री प्रशिक्षकपद सोडणार असल्याची माहिती
भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री आणि त्यांचा सहाय्यक प्रशिक्षक वर्ग आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर आपल्याला मुदतवाढ देऊ नये अशी विनंती रवी शास्त्री यांनी बीसीसीआयला केल्याचे समजते. तसेच, इतर सपोर्ट स्टाफदेखील विविध IPL संघांशी चर्चा करत असल्याने त्यांना पदत्याग करायचा असल्याची माहिती आहे. याच दरम्यान, शनिवारी रात्रीपासून अचानक एका श्रीलंकने खेळाडूचा कोच म्हणून प्रचंड उदो उदो केला जातोय. तो खेळाडू म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने.
भारतीय संघाविरूद्ध हमखास चांगली खेळी करणार महेला जयवर्धने हा सध्या कोच म्हणून आपली कारकिर्द गाजवतोय. IPL मध्ये गेली काही वर्षे मुंबई इंडियन्स संघाचा कोच असलेल्या जयवर्धनेने संघाला त्याच्या मार्गदर्शनाखाली तीन वेळा विजेतेपद जिंकवून दिले. त्यातच भर म्हणून 'द हंड्रेड' नावाच्या इंग्लंडमधील एक क्रिकेट लीगमध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली सदर्न ब्रेव्ह नावाच्या संघाने पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात सदर्न ब्रेव्ह संघाने निर्धारित १०० चेंडूत ५ बाद १६८ धावा केल्या. त्यास प्रत्युत्तर देताना बर्मिंगहॅम फिनिक्स संघाने ५ बाद १३६ धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे त्याच्या संघाचा ३२ धावांनी पराभव झाला. या विजयानंतर सदर्न ब्रेव्ह संघाचा कोच असलेल्या महेला जयवर्धनेची चांगलीच चर्चा रंगली. भारतीय संघाचा पुढचा कोच महेला जयवर्धनेलाच करा अशी मागणीही नेटिझन्सने केली. पाहूया त्यापैकी काही निवडक ट्वीट-
दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड हे तिघेही आपापल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टी२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर हे तिघेही आपल्या पदाचा त्याग करणार असल्याचे बोलले जात आहे. रवी शास्त्री यांनी BCCI ला विनंती केली आहे की त्यांचा प्रशिक्षकपदाचा करार वाढवू नये असे सांगितल्याचेही बोलले जात आहे. त्याशिवाय, कोचिंग स्टाफमधील काही सदस्य विविध IPL संघांसोबत चर्चा करत आहेत. अशा परिस्थितीत BCCI चे काही सदस्य माजी फलंदाज राहुल द्रविड याच्याशी प्रशिक्षकपदाबद्दल चर्चा करत असल्याचेही सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.