Mumbai Indians : आयपीएलच्या अनेक फ्रेंचायजींनी जगभरातील टी 20 लीगमधील संघ खरेदी केले आहेत. याचबरोबर अनेक फ्रेंचायजींनी आयपीएल 2023 ची तयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपला जागतिक विस्तार वाढवल्यानंतर व्यवस्थापनामध्ये मोठे बदल केले आहेत. मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेची ग्लोबल परफॉर्मन्स हेड म्हणून नियुक्ती केली आहे. तर जहीर खानची ग्लोबल क्रिकेट डेव्हलपमेंट हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Mumbai Indians Give Mahela Jayawardena Zaheer Khan Global Responsibility After South Africa and UAE Expansion)
या नव्या नियुक्त्यांबाबत रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'आमच्या ग्लोबल कोअर टीममध्ये महेला आणि जहीर भुमिका बजावणार आहेत याचा आनंद आहे. मुंबई इंडियन्स कुटुंबाचा हे दोघेही भाग आहेत. मला विश्वास आहे की मुंबई इंडियन्सचे ब्रँड ऑफ क्रिकेट जागतिक स्तरावरही पोहचवतील.'
दरम्यान, जयवर्धने आपल्या नव्या भुमिकेविषयी म्हणतो की, 'मुंबई इंडियन्सच्या ग्लोबल क्रिकेट ऑपरेशनचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. नीता अंबानी आणि आकाश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स जागतिक स्तरावरील सर्वात मोठी क्रिकेट फ्रेंचायजी झाली आहे. मला मुंबई इंडियन्सची जागतिक स्तरावर झालेली वाढ पाहून आनंद होत आहे. मी नव्या जबाबदारीकडे क्रिकेटचा जागतिक ब्रँड तयार करण्याची एक संधी म्हणून पाहत आहे.'
दुसरीकडे क्रिकेट डेव्हल्पमेंट ग्लोबल हेड म्हणून नियुक्ती झालेल्या जहीर खानने 'नीता अंबानी आणि आकाश यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि नवी जबबादारी दिली ती मी विनंम्रपणे स्विकारतो. एक खेळाडू आणि प्रशिक्षक टीम मधील एक सदस्य म्हणून मुंबई इंडियन्स हे माझे दुसरे घरच राहिले आहे. आता आम्ही नव्या प्रवासाला सुरूवात करत आहोत. जागतिक स्तरावर नवीन क्षमता आणि गुणवत्तेला मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाशी जोडण्यासाठी मी काम करेन.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.