mumbai marathon gujarat women nirmaben thakor rank 1st full marathon 2 hr 47m 11s Sakal
क्रीडा

Mumbai Marathon : गुजरातने सोडले, महाराष्ट्राने तारले; निरमाबेनची पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी

गुजरातच्या निरमाबेन ठाकोर हिने मुंबई पूर्ण मॅरेथॉनमधील भारतीय महिलांच्या विभागात विजेता होण्याचा मान संपादन केला. तिने २ तास, ४७ मिनिटे व ११ सेकंदात शर्यत पूर्ण करीत पहिल्या स्थानाला गवसणी घातली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गुजरातच्या निरमाबेन ठाकोर हिने मुंबई पूर्ण मॅरेथॉनमधील भारतीय महिलांच्या विभागात विजेता होण्याचा मान संपादन केला. तिने २ तास, ४७ मिनिटे व ११ सेकंदात शर्यत पूर्ण करीत पहिल्या स्थानाला गवसणी घातली.

रेश्मा केवटे हिने तीन तास, तीन मिनिटे व ३४ सेकंदात शर्यत पूर्ण करीत दुसरे स्थान मिळवले. श्यामली सिंग हिने तीन तास, चार मिनिटे व ३५ सेकंदात शर्यत पूर्ण केली तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली.

दैनिक सकाळकडून निरमाबेन हिच्याशी संवाद साधण्यात आला. त्या वेळी तिने मनातील भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, गुजरातमधील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होते; पण तीन वर्षे मला त्यांच्या नियमानुसार कामगिरी करता आली नाही (पहिल्या तीन स्थानांत येणे). त्यामुळे त्यांच्याकडून मला अकादमीमधून काढून टाकण्यात आले.

पुढे ती सांगते की, त्यानंतर केनियामध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तीन महिने सरावही केला. यासाठी वडिलांनी तीन लाखांचे कर्जही घेतले होते. केनियामधून महाराष्ट्राकडे वळली. आता नाशिकमधील एकलव्य अकादमीमध्ये कसून सराव करीत आहे. महाराष्ट्रात माझ्या कारकिर्दीला चांगले वळण मिळाले आहे.

मॅरेथॉनमधील बक्षीस मोलाचे

निरमाबेन हिने मुंबईतील पूर्ण मॅरेथॉनमध्ये महिला विभागात विजेतेपदावर नाव कोरून मोलाचे बक्षीस मिळवले. या बक्षिसामुळे वडिलांनी घेतलेले कर्ज फेडता येईल. तसेच स्वतःच्या कारकिर्दीसाठीही काही रक्कम शिल्लक ठेवण्यात येईल. असे निरमाबेन हिच्याकडून सांगण्यात आले.

भारतीय पुरुष विभागात पूर्ण मॅरेथॉनमध्ये आर्मीच्या खेळाडूंनी भरारी घेतली. श्रीनु बुगाता याने २ तास, ९ मिनिटे व ५३ सेकंद अशा वेळेत शर्यत पूर्ण केली व पहिला क्रमांक पटकावला. गोपी थोनाकल याने २ तास, ११ मिनिटे व ८ सेकंदात शर्यत पूर्ण करीत दुसरे स्थान मिळवले. हे दोन्ही खेळाडू आर्मीचेच.

ब्रेन ट्युमरनंतर यशाला गवसणी

पश्चिम बंगालच्या श्यामली सिंग हिने भारतीय महिला विभागातील पूर्ण मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक पटकावला; पण २०२०मध्ये तिला ब्रेन ट्युमर या आजाराला सामोरे जावे लागले. तिच्या या आजारपणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्चही झाला. तिचा पती संतोष सिंग याने याप्रसंगी तिला मोलाचा आधार दिला. गंभीर आजारावर तिने मात करीत मोठी झेप घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT