Ranji Trophy sakal
क्रीडा

Ranji Trophy : मुंबईचा बाद फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्‍चित ; रहाणे, शार्दुल, तुषार देशपांडेच्या पुनरागमनामुळे ताकद वाढली

पाच सामन्यांत चार मोठे विजय आणि सर्वाधिक २७ गुणांसह ‘ब’ गटात आघाडी अशी यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत वाटचाल करणाऱ्या मुंबईचा उद्यापासून सुरू होणाऱ्या सामन्यात छत्तीसगड संघाविरुद्ध सामना होत आहे. काही प्रमुख खेळाडू संघात परतले असल्यामुळे मुंबईची ताकद अधिकच वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

रायपूर : पाच सामन्यांत चार मोठे विजय आणि सर्वाधिक २७ गुणांसह ‘ब’ गटात आघाडी अशी यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत वाटचाल करणाऱ्या मुंबईचा उद्यापासून सुरू होणाऱ्या सामन्यात छत्तीसगड संघाविरुद्ध सामना होत आहे. काही प्रमुख खेळाडू संघात परतले असल्यामुळे मुंबईची ताकद अधिकच वाढली आहे. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीतही मुंबई संघाची ताकद अधिक आहे. आता अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे हे खेळाडू संघात परतल्यामुळे मुंबईचा संघ अधिक ताकदवर झाला आहे.

सर्वाधिक २७ गुणांची कमाई करणाऱ्या मुंबईचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. आता केवळ त्यावर शिक्कामोर्तब होणे शिल्लक आहे. छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यातून मुंबई संघाला हे उद्दिष्ट पार करायचे आहे. एकीकडे संघ म्हणून प्रगती होत असताना प्रमुख फलंदाजांना अजून अपेक्षित सूर सापडलेला नाही किंवा ज्यांनी धावा केल्या आहेत त्यांना सातत्य राखता आलेले नाही. सुरुवातीचा फलंदाज लवकर बाद झाल्यावर तळाच्या फलंदाजांनी डाव सावरलेला आहे.

आता फारसे दडपण नसल्यामुळे प्रमुख फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि याची सुरुवात कर्णधार अजिंक्य रहाणेपासून सुरू होणार आहे. दुखापतीमुळे तो दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता आणि ज्या तीन सामन्यांत खेळला. त्यापैकी दोन सामन्यांत तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

महाराष्ट्राला मोठा विजय हवा

गहुंजे स्टेडियमवर उद्यापासून महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात ‘अ’ गटातील सामना होत आहे. विदर्भने पाच सामन्यांतून सर्वाधिक २० गुण मिळवत आघाडी घेतली आहे, तर पाचपैकी दोन सामने गमावणाऱ्या आणि दोन सामने अनिर्णित राहिलेला महाराष्ट्राचा संघ सहाव्या स्थानावर आहे. बाद फेरीसाठी त्यांना आपले आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर बोनस गुणासह विजय आवश्यक आहे. तरीही पुढचा प्रवास सोपा होईल असे नाही.

पृथ्वी शॉसाठीही महत्त्वाचा सामना

पृथ्वी शॉ सुद्धा दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. मुंबईच्या बंगालविरुद्धच्या सामन्यात तो खेळला; परंतु त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. बाद फेरीसाठी तोही फॉर्मात येणे मुंबईसाठी महत्त्वाचे आहे.

शार्दुलचा पहिला सामना

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यंदाच्या मोसमात प्रथमच रणजी सामना खेळणार आहे. आफ्रिका दौऱ्यात पहिला कसोटी सामना २९ डिसेंबरला संपल्यानंतर शार्दुल कोणताही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यातून आता तो तंदुरुस्त झालेला असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे. शार्दुलप्रमाणे वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेही पुनरागमन करत आहे. भारत ‘अ’ संघातून खेळत असल्यामुळे तो मुंबई संघात नव्हता. शार्दुल आणि तुषार यांना अंतिम ११ संघात स्थान देताना कोणाला वगळले जाणार हे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT