Muttiah Muralitharan Tickets In Asia Cup 2023 : श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चांगलाच जाळ काढला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 मधील सामना हा पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान स्टेडियम जवळपास रिकामे पडले होते.
श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांनी आशियातील या सर्वात हाय व्होल्टेज सामन्याकडे सपशेल पाठ फिरवली. यानंतर आशिया कपला मिळणाऱ्या थंडा प्रतिसादाला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जबाबदार असल्याचे टीका होऊ लागली आहे. मुथय्या मुरलीधरनने देखील यासाठी पीसीबीच्या वाढीव तिकीट दराला जबाबदार धरले.
मुरलीधरन म्हणाला की, 'यंदाच्या आशिया कपचे यजमान पद हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. त्यांनीच तिकीटाचे दर निश्चित केले आहेत. श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. तिकीटाच्या किंमती या खरोखरच खूप जास्त आहेत. हे दर भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी ऐत्या वेळी कमी करण्यात आले. मात्र याचा काही उपयोग झाला नाही.'
'श्रीलंकेत आशिया कपचे तिकीट हे 6000 श्रीलंकन रूपयापासून सुरू होते. जर तुम्हाला ग्रँड स्टँडमधून सामना पाहायचा आहे तर तुम्हाला 40000 ते 50000 श्रीलंकन रूपये मोजावे लागतील. हा तिकीट दर एका व्यक्तीच्या महिन्याच्या वेतानाएवढा आहे. मला नाही वाटत की श्रीलंकेत एवढे पैसे कोण खर्च करू शकेल.'
मुरलीधरनने सांगितले की श्रीलंकेतील क्रिकेट चाहते भावनिक आहेत. मात्र तिकीट दरामुळे ते मैदानाकडे पाठ फिरवत आहेत. मुरलीधनर पुढे म्हणाला की, 'श्रीलंकेत ज्यावेळी क्रिकेट सामना असतो त्यावेळी स्टेडियम खचाखच भरलेलं असतं. लोकं स्टेडियममध्ये येऊन सामना पाहतात. मात्र तिकीट दर जास्त असल्याने ते तिकीट खरेदी करू शकत नाहीयेत.'
श्रीलंकेचा माजी फिरकीपटू पुढे म्हणाला की, 'भारत - पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे टाय झाला होता. पावसाची शक्यता वर्तवली होती त्यामुळे क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये आले नाही. याचबरोबर सुपर 4 च्या सामन्यांबाबत काही संभ्रम देखील होता. फायनल कोठे होणार हे निश्चित नव्हते त्यामुळे लोकं तिकीटे खरेदी करण्यासाठी घाबरत आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.