नवी दिल्ली : गोलंदाजीसाठी आवश्यक असलेली तंदुरुस्ती अजून न मिळालेला हार्दिक पंड्या मुंबईत पुनर्वसन प्रकियेत मेहनत घेत आहे. याची माहिती त्याने त्याची राज्य संघटना असलेल्या बडोदा क्रिकेट संघटनेने विचारणा केल्यानंतर दिली आहे.
उद्यापासून विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. बडोदा क्रिकेट संघटनेने त्याच्या उपलबद्धतेसंदर्भात विचारणा केली. त्यानंतर हार्दिकने आपण मुंबईत पुनर्वसन प्रक्रिया करत आहोत असे एका ओळीचे उत्तर दिले आहे, अशी माहिती बडोदा क्रिकेट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली.
हार्दिकच्या दुखापतीची नेमकी स्थिती काय आहे, अशी विचारणा केल्यानंतर बडोदा संघटनेच्या या पदाधिकाऱ्याने आपल्यालाही निश्चित माहिती नसल्याचे सांगितले. २०१९ मध्ये पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त दिसून आलेला नाही.
कृणाल पंड्याला तंबी
हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्याला बडोदा क्रिकेट संघटनेने तंबी दिली होती. हजारे करंडक स्पर्धेत खेळायचे असेल तर आठवड्यापूर्वी होणाऱ्या सराव शिबिरात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शिबिरातील खेळाडूंचीच अंतिम संघात निवड केली जाईल. तुला थेट सामन्यासाठी संघात येता येणार नाही, असे स्पष्ट शब्दांत कृणालला सांगण्यात आले होते.
पुनरागमन अनिश्चितच
हार्दिक पंड्या मुळात तंदुरुस्तीच्या शोधात आहे. तंदुरुस्ती मिळवल्यानंतर त्याला राष्ट्रीय स्पर्धांतून तंदुरुस्तीसह फॉर्मही सिद्ध करावा लागेल, त्यानंतरच त्याची राष्ट्रीय संघात निवड होऊ शकते, त्यामुळे सध्या तरी हार्दिकचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन अनिश्चित काळासाठी लांबले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.