Najam Sethi Asia Cup 2023 : यंदाच्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. बीसीसीआय आणि पीसीबीनेही यासाठी संमती दिली आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित सामने श्रीलंकेत खेळले जातील.
भारत फक्त श्रीलंकेत खेळणार आहे. मात्र त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ उडाली आहे. पीसीबी प्रमुख नजम सेठी यांच्या एका ट्विटने दहशत निर्माण केली आहे.(pakistan cricket board chief Najam Sethi)
आशिया कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा राडा झाला. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पुढील बोर्ड चेअरमन होण्याच्या शर्यतीतून स्वत:ला बाहेर काढल्यानंतर नजम सेठी यांनीही पीसीबी प्रमुखपद सोडले आहे. सेठी हे अंतरिम व्यवस्थापन समितीचे प्रमुख होते, जी गेल्या डिसेंबरपासून बोर्ड चालवत होती. मात्र त्याची मुदत 21 जून रोजी संपणार होती.
सध्याचे प्रमुख नजम सेठी यांनी एक ट्विट केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अचानक खळबळ उडाली आहे. त्याने ट्विट करून पीसीबी अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून स्वतःला बाहेर काढले आहे. नजम सेठी यांनी ट्विट करून लिहिले, 'सर्वांना सलाम! मला आसिफ झरदारी आणि शेहबाज शरीफ यांच्यातील वादाचे कारण बनायचे नाही. अशा प्रकारची अस्थिरता आणि अनिश्चितता पीसीबीसाठी चांगली नाही. अशा परिस्थितीत मी पीसीबी अध्यक्षपदाचा उमेदवार नाही. सर्व संबंधितांना हार्दिक शुभेच्छा.
अलीकडेपर्यंत अंतरिम सेटअप संपल्यानंतर आणि बोर्डाच्या योग्य अध्यक्षाची नियुक्ती झाल्यानंतर सेठी पुढे जातील अशी शक्यता दिसत होती. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून झका अश्रफ यांच्या पुनरागमनाची अटकळ जोर धरू लागली होती.
मात्र बोर्डाचे माजी अध्यक्ष अश्रफ यांचे पुनरागमन अद्याप अधिकृत नाही. पण सेठी यापुढे या पदावर राहणार नाहीत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.