अलूर - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सिक्कीमचा दणदणीत विजय मिळवून जोरदार सलामी दिली. सात विकेटने विजय मिळवणाऱ्या मुंबईने ९० धावांचे लक्ष्य १२ षटकांत पार करून २२८ चेंडू राखून विजय मिळवताना सरासरी कमालीची उंचावली.
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, यशस्वी जयस्वाल आणि जखमी पृथ्वी शॉ अशा नावाजलेल्या खेळाडूंसह खेळतानाही मुंबईने आपली तादक दाखवली.
सिक्कीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, परंतु पहिल्या षटकापासून त्यांची घसगुंडी सुरू झाली. या ८९ धावांत कर्णधार नीलेश लामिचानेच्या २९ आणि अवांतर १६ धावांचा समावेश आहे. त्यांच्या इतर सर्व फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले.
झटपट विजयाचे उद्दिष्ट ठेवून फलंदाजीस उतरणाऱ्या मुंबईला अंगरीश रघुवंशी आणि जय बिश्त यांनी जोरदार सलामी दिली, परंतु त्यापैकी एकाला अर्धशतक करता आले नाही. विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अजिंक्य रहाणेला मैदानात यावे लागले. मुंबईचा दुसरा सामना केरळविरुद्ध २५ तारखेला होणार आहे.
केरळचा सौराष्ट्रला धक्का
केरळ संघाने गतविजेत्या सौराष्ट्र संघाला सलामीलाच धक्का देताना तीन विकेटने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सौराष्ट्रचा डाव १८५ धावांत संपुष्टात आला. यात विश्वराजसिंह जडेजाने ९८ धावांची खेळी केली. केरळकडून अकहिनने चार; तर बासिल थंपी आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. हे माफक आव्हान पार करताना केरळचीही ४ बाद ६१ अशी घसरगुंडी उडाली होती. संजू सॅमसन ३० धावाच करू शकला.
संक्षिप्त धावफलक - सिक्कीम ३८.१ षटकांत ८९ (नीलेश लामिचाने २९, तुषार देशपांडे ७-१-१९-३, मोहित अवस्थी ७-३-९-२, अर्थव अंकोलेकर ६-३-१३-२) पराभूत वि. मुंबई ः १२ षटकांत ३ बाद ९० (अंकरिष रघुवंशी ३०- २८ चेंडू, ४ चौकार, जय बिश्त २८- २२ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, अजिंक्य रहाणे नाबाद १५)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.