National Sports Award 2023 Mohammed Shami : केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून आज आज (दि. 20) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सर्वात प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार हा सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन जोडीला मिळाला आहे. तर वर्ल्डकप 2023 मधील कामगिरीनंतर शेवटच्या क्षणी शिफारस झालेल्या मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभ हा राष्ट्रपती भवन येथे 9 जानेवारी 2024 ला होणार असून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारप्राप्त खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे.
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही बॅडमिंटन जगतातील भारताची प्रसिद्ध जोडी आहे. त्यांनी या वर्षी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन टायटल जिंकलं. त्याचबरोबर स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन आणि कोरिया ओपनमध्ये देखील विजेतेपद पटकावलं.
या जोडीने एशियन गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताला एशियन गेम्सच्या इतिहासातील पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. याचबरोबर एप्रिल महिन्यात एशियन चॅम्पियनशिपमध्ये देखील सुवर्ण पदक पटकावून दिलं होतं.
त्यांनी BWF ranking मध्ये अव्वल स्थानावर पोहचणारी भारताची पहिली बॅडमिंटन जोडी होण्याचा मान देखील पटकावल होता. गेल्या वर्षी त्यांनी थॉमस कप जिंकून देत इतिहास रचला. राष्ट्रकुल स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्ण पदक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकून दिलं होतं.
मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (अंध क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग) , आर वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाला (अश्वस्वार), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग), अंतीम पंघल (कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), एशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), सुनील कुमार (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग), पवन कुमार (कबड्डी). ), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो खो).
गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), शिवेंद्र सिंग (हॉकी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.