National Women Shooter Prerna Yadav 
क्रीडा

दिवसा प्रॅक्टिस अन्‌ रात्री ड्यूटी!

राष्ट्रीय महिला नेमबाज प्रेरणा यादवचा संघर्षपूर्ण प्रवास

नरेंद्र चोरे

नागपूर : शूटिंग हा महागडा खेळ असल्यामुळे यात सहसा गोरगरीब घरातील खेळाडू करिअर करण्याची हिंमत करत नाही. मात्र राष्ट्रीय महिला नेमबाज प्रेरणा यादवने तो धोका पत्करला. तिने आईवडिलांवर अवलंबून न राहता खेळासाठी रात्रपाळी ड्यूटी करून व त्यानंतर मिळालेल्या वेळेत प्रॅक्टिस करत आपल्या करिअरला आकार दिला. प्रेरणाने केवळ करिअरच घडविले नाही तर, राष्ट्रीय स्तरापर्यंत उंच झेप घेऊन अन्य मुलींनाही वाट दाखविली आहे. शहरातील इतर खेळाडूंप्रमाणे प्रेरणानेही गरिबी व संघर्ष जवळून पाहिला व अनुभवला आहे.

एका साधारण कुटुंबात जन्मलेल्या प्रेरणाचे वडील फुलचंद हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, आई विमल गृहिणी आहे. कोरोनामुळे वडिलांचा व्यवसाय ठप्प पडल्याने व तब्येत ठीक राहात नसल्याने सध्या ते घरीच आहेत. अशा विपरीत परिस्थितीत महागडा शूटिंग सुरू ठेवणे प्रेरणासमोर फार मोठे आव्हान होते. गरिबीचे चटके बसू लागल्यानंतर उच्चशिक्षित प्रेरणाला आपला शौक पूर्ण करण्यासाठी एका अमेरिकन बेस्ड कंपनीत नाईट शिफ्टमध्ये पार्टटाइम जॉब करावा लागला. रात्रभर नऊ तास ड्यूटी केल्यानंतर न थकता दुसऱ्या दिवशी सकाळी घरची सर्व कामे आटोपून ती पुन्हा नव्या दमाने शूटिंग रेंजवर जाते.

गुरूंच्या मार्गदर्शनात प्रॅक्टिस करीत असते. ड्यूटी, खेळ आणि शिक्षण अशी तिहेरी भूमिका यशस्वीरीत्या पार पाडत प्रेरणाने राष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत नाव कमावले आहे. युवा नेमबाजांसाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या प्रेरणाने गेल्या आठ-नऊ वर्षांत विविध जिल्हा, विभागीय, राज्य, आंतरविद्यापीठ व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये २५ ते ३० मेडल्स जिंकले आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची तिची इच्छा असून, ऑलिम्पिकमध्ये पदक व वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे स्वप्न आहे.

बनायचे होते डॉक्टर, झाली खेळाडू

एम.बीए, एम. ए, बी.पीएड. पूर्ण केल्यानंतर सध्या एम.पीएड. करीत असलेल्या प्रेरणाला खरं तर डॉक्टर व्हायचे होते. मात्र प्रवेश न मिळाल्याने तिला मार्ग बदलावा लागला. फावल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या उद्देशाने लहान बहिणीप्रमाणे तीदेखील शूटिंगमध्ये आली. आईवडिलांनीही तिला सपोर्ट केला. येस स्पोर्ट्स अकादमीत प्रशिक्षक शशांक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्राथमिक धडे गिरवले. प्रेरणाचे टॅलेंट बघून नागपूर जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे चंद्रकांत देशमुख व अभिजित देशमुख यांनीही तिला वेळोवेळी मदतीचा हात देत ‘मोटिव्हेट'' केले.

मला इतर मुलींप्रमाणे चार भिंतीच्या आड चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहायचे नव्हते. मला समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करायची होती. माझे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी, राष्ट्रीय नेमबाज बनून क्रीडा क्षेत्रात निश्चितच छाप सोडली. आईवडील, प्रशिक्षक आणि संघटनेच्या प्रोत्साहनामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले.

-प्रेरणा यादव, राष्ट्रीय महिला नेमबाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT