Neeraj Chora  Sakal
क्रीडा

Neeraj Chopra : नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, डायमंड लीगवर कोरलं नाव

नीरजने 89.08 मीटरच्या पहिल्या थ्रोने लॉसने डायमंड लीगवर विजय मिळवला.

निनाद कुलकर्णी

Neeraj Chopra Wins Lausanne Diamond League : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत लुसाने डायमंड लीग 2022 वर नाव कोरले आहे. ही स्पर्धा जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला आहे. नीरजने 89.08 मीटरच्या पहिल्या थ्रोने लॉसने डायमंड लीगवर विजय मिळवला.

गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना नीरजच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. अलीकडेच, नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. अंजू बॉबी जॉर्जनंतर (2003) हे पदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला. अंतिम फेरीत नीरजने 88.13 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून रौप्यपदक जिंकले.

डायमंड लीगचा ताज जिंकणारा ठरला पहिला भारतीय

हरियाणातील पानिपतजवळील खंडारा गावात राहणारा नीरज चोप्रा डायमंड लीगचा मुकुट जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. चोप्राच्या आधी डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय होता.गौडा यांनी 2012 न्यूयॉर्क आणि 2014 दोहामध्ये दोनदा दुसरे स्थान पटकावले होते, याशिवाय 2015 मध्ये शांघाय आणि यूजीनमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत दोनदा तिसरे स्थान पटकावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT