टोकिओ ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने डायमंड लीगमध्ये उत्कृष्ट थ्रोसह वापसी केली आहे. त्याने आपल्या पहिल्याच थ्रोमध्ये आपला मागील विक्रम मोडला आहे. स्टार एथिलेटने स्वीडनमध्ये सुरु असलेल्या डायमंड लीगच्या स्टाॅकहोम सत्रात ८९.९४ मीटरचे रेकाॅर्ड थ्रोसह एक नवीन राष्ट्रीय विक्रम बनवला आहे. २४ वर्षाच्या नीरजने ८९.३० मीटरचा मागील विक्रम मोडला आहे, तो विक्रम त्याने तुर्कूमध्ये पावो नुरमी खेळांमध्ये रचला होता. (Neeraj Chopra Make New National Record After Breaking His Previous One)
आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात त्याने ८४.३७ मीटर भाला फेकला असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अँडरसन पीटरसन आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ९० मीटर पार करून पहिल्या स्थानी आहे. त्याने ९०.३१ मीटर लांब भाला फेकला. टोकिओ ऑलिम्पिकनंतर २४ वर्षीय नीरजचा हा दुसरा सामना आहे. तो टोकिओ ऑलिम्पिकमध्ये एथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणार पहिला भारतीय आहे.
त्याने या आठवड्याच्या प्रारंभी पावो नुरमी खेळांमध्ये ८९.३० मीटर भालाफेक करुन रजत पदक जिंकले होते आणि आपलाच राष्ट्रीय विक्रमही मोडला होता. नीरज स्टाॅकहोममध्ये भाग घेणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. या डायमंड लीगमध्ये तो सातव्यांदा सहभागी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.