Neeraj Chopra  sakal
क्रीडा

Neeraj Chopra : नीरज चोप्राची पॅरिस ऑलिंपिकची तयारी;फिनलंडमधील स्पर्धा आज

सकाळ वृत्तसेवा

तुर्कु (फिनलंड) ­: दुखापतीमुळे विश्रांती घेणारा ऑलिंपिक व जागतिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पुनरागमन करणार आहे. फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये तो आपले कसब दाखवणार आहे. ही स्पर्धा उद्या (ता. १८) होणार असून मॅक्स डेहनिंग, ओलिव्हर हेलँडर, अँडरसन पीटर्स, केशॉर्न वॉलकॉट या स्टार खेळाडूंचा सहभागही या स्पर्धेत असणार आहे. त्यामुळे नीरजचा कस लागणार, हे निश्‍चित आहे.

भारताच्या नीरज चोप्रा याला अद्याप ९० मीटर दूर भाला फेकता आलेला नाही. ९० मीटर पार करण्याचा ध्यास त्याने बाळगला आहे, पण जर्मनीच्या १९ वर्षीय मॅक्स डेहनिंग याने हॉल येथील स्पर्धेत ९०.२० मीटर दूर भाला फेकून विक्रम नोंदवला होता. सर्वात कमी वयामध्ये ९० मीटरपेक्षा दूर भाला फेकणारा तो अव्वल खेळाडू ठरला, हे विशेष. नीरजसमोर मॅक्स याचे आव्हान असणार आहे, एवढं मात्र निश्‍चित आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्येही नीरज - मॅक्स यांच्यामध्ये लढत रंगण्याची दाट शक्यता आहे. फिनलंड देशाचा खेळाडू ओलिव्हर हेलँडर, ग्रेनडाचा खेळाडू अँडरसन पीटर्स व त्रिनिदाद व टोबॅगोचा खेळाडू केशॉर्न वॉलकॉट या खेळाडूंकडूनही नीरज चोप्राला कडवी झुंज मिळू शकते. जाकूब वादलेच हा मात्र फिनलंडमधील स्पर्धेत सहभागी होणार नाही.

नीरज मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये त्याने ८८.३६ मीटर दूर भाला फेकत रौप्यपदक पटकावले. त्यानंतर राष्ट्रीय फेडरेशन करंडकातही त्याने सहभाग घेतला, मात्र या स्पर्धेत त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी केली नाही. नीरज याने ८२.२७ मीटर दूर भाला फेकला. तरीही भारतातील खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा नसल्यामुळे त्याला सुवर्णपदक पटकावता आले.

आता थेट ऑलिंपिक?

फिनलंडमधील स्पर्धेनंतर नीरज चोप्रा ७ जुलैपासून सुरू होत असलेल्या पॅरिस डायमंड लीगमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. ऑलिंपिकआधीच्या व्यग्र वेळापत्रकामुळे नीरज याने पंचकुला येथील राष्ट्रीय आंतर राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेतून माघार घेतली. फेडरेशन करंडकानंतर तो म्हणाला होता की, ऑलिंपिकआधी कोणत्या स्पर्धेमध्ये खेळायचे आणि कोणत्या स्पर्धेमध्ये खेळायचे नाही, हे माझी तंदुरुस्ती पाहून ठरवणार आहे. यावेळी त्याने फिनलंडमधील स्पर्धेनंतर थेट पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची शक्यता व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT