neeraj chopra  
क्रीडा

Neeraj Chopra : नीरज चोप्राचं असंही देशप्रेम! तिरंग्याचा मान राखत टी शर्टवर दिला ऑटोग्राफ, सर्वत्र होतंय कौतुक

रोहित कणसे

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नीरजने या विजयानंतर तिरंग्याचा मान राखत पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत.

बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने ८८.१७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं. हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. हे ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर नीरजने तिरंगा सोबत घेत फोटोसाठी पोज दिली. यादरम्यान त्याने पाकिस्तानचा अॅथलीट अर्शद नदीमलाही आपल्यासोबत फोटोसाठी बोलावलं याचे देखील सर्वत्र खूप कौतुक झालं. यानंतर आता नीरजने तिरंग्याबद्दल दाखवलेला आदर चर्चेचा विषय ठरला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार विजयानंतर नंतर हंगेरियनची एक महिला चाहती त्याच्याकडे आली. या महिलेने महिलेने हिंदीतून नीरजला ऑटोग्राफ मागितला. नीरजने लगेच होकार दिला, पण जेव्हा महिला चाहतीने ऑटोग्राफसाठी तिरंगा हातात धरला तेव्हा मात्र नीरजने भारतीय ध्वजावर सही करण्यास नकार दिला. त्याएवजी नीरजने त्या महिलेच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. नीरजने तिरंग्याबद्दल दाखवलेल्या आदराने सर्वांची मनं जिंकली.

यापूर्वीही दिसून आलं होतं तिरंगा प्रेम

यापूर्वीही तिरंग्याच्या सन्मान करत नीरजने चाहत्यांची मने जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंप्रमाणे नीरजनेही तिरंगा फडकावत आनंद साजरा केला. मात्र, सेलिब्रेशन केल्यानंतर बहुतांश खेळाडू आपल्या देशाचा ध्वज जमिनीवर फेकतात किंवा खुर्चीवर ठेवतात, पण नीरजने तसे केले नाही. उत्सवानंतर त्यांनी तिरंगा दुमडून पूर्ण आदराने आपल्या बॅगेत ठेवला. या घटनेनंतरही त्यांचे खूप कौतुक झाले होते.

सोशल मीडियावर याबद्दल अनेक युजर्सनी पोस्ट केल्या आहेत. या वापरकर्त्यांने एका लिहीलं की अतिशय गोड हंगेरियन महिलेला (जी उत्कृष्ट हिंदी बोलते) नीरज चोप्राचा ऑटोग्राफ हवा होता. नीरज नक्की देईन म्हणाला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की तीला भारतीय ध्वजावर ऑटोग्राफ हवा आहे. 'वहा नही साइन कर सक्ता' नीरजने तिला सांगतलं. अखेरीस त्याने तिच्या शर्टच्या स्लीव्हवर सही केली. यावर देखील ती महिली खूप खुश झाली.

स्पर्धेत पाकिस्तानचा नदीम दुसरा

या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसरे स्थान पटकावले. राष्ट्रकुल चॅम्पियन अर्शद नदीमने ८७.८२ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक जिंकले, तर झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजने ८६.६८ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जॅव्हेलिन थ्रो च्या फायनलमध्ये डीपी मनू, किशोर जेना यांचाही सहभाग होता. किशोर जेना ८४.७७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पाचव्या आणि डीपी मनूने ८४.१४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहावे स्थान मिळविले. नीरजचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक होते, २०२२ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले होते.

यापूर्वी अंजू बॉबी जॉर्ज यांनी २००३ मध्ये महिलांच्या लांब उडीच्या जागतिक स्पर्धेत देशासाठी कांस्यपदक जिंकले होते. दरम्यान हे पदक जिंकल्यानंतर नीरजने सांगितले की, त्याला या स्पर्धेत ९० मीटरचा टप्पा पार करायचा आहे, पण परिस्थिती पूर्णपणे त्याच्या अनुकूल नव्हती. यापुढील स्पर्धेतही तो यशस्वी होईल, असा विश्वास त्यांने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT