Neeraj-Chopra-Avani-Lekhara 
क्रीडा

Tokyo Paralympic: नीरज चोप्राने मानले अवनीचे आभार, कारण...

विराज भागवत

अवनी लेखाराने पॅरालिम्पिकमध्ये पटकावलं सुवर्णपदक

Tokyo Paralympics: टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या अवनी लेखारा हिने सुवर्णपदक पटकावले. १० मिटर एअर रायफल शूटींग स्पर्धेमध्ये अवनी लेखाराने सुवर्णपदक कमावले. रविवारचा दिवस भारतासाठी खूपच चांगला होता. रविवारी भारताने तीन पदके मिळवली. तिच्या या सुवर्णकामगिरीसाठी टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि रौप्यपदक विजेती मीराबाई चानू हिने अवनीचे कौतुक केले. भारताचे राष्ट्रगीत पॅरालिम्पिकमध्ये पुन्हा एकदा ऐकायला मिळाल्याबद्दल नीरजने अवनीचे आभार मानले.

अवनीने असाका शूटींग रेंजवर महिलांच्या १० मीटर एअर रायफल SH1मध्ये सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला. १९ वर्षीय अवनी ही पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णकमाई करणारी पहिलीवहिली महिला खेळाडू ठरली. अवनीने एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली. तिने २४९.६ गुणांसह सुवर्ण पदक कमावले. तिच्या कामगिरीसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत आतापर्यंत भारताने सात पदकं जिंकत २०१६ च्या रिओ पॅरालिंपिकमधील आपल्या कामगिरीला मागे टाकले आहे. २०१६च्या रिओ पॅरालिंपिकमध्ये भारतानं चार पदकं जिंकली होती. यंदा भारतासाठी पदकाची सुरुवात भाविना पटेल हिने टेबल टेनिसपासून केली. त्यानंतर निशाद कुमारने उंच उडीत तर विनोद कुमारने थाळीफेकमध्ये पदक मिळवलं. त्यानंतर मध्ये अवनी लेखारा हिने सुवर्ण पदक मिळवले. तर थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाने तर भालाफेकमध्ये देवेंद्र झांझरिया आणि सुंदर कुमार गुर्जरने रौप्यपदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT