Neeraj Chopra vs Arshad Nadeem esakal
क्रीडा

Neeraj vs Arshad Net Worth : गोल्ड जिंकल्यानंतर नीरजला मिळाली होती कार तर नदीमला म्हैस! दोघांच्या संपत्तीमध्ये फरक किती?

रोहित कणसे

खेळाच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान जेव्हा कधी आमनेसामने येतात तेव्हा सामना पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडतात. नुकतेच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा खेळाडू एकमेकांविरोधात खेळले. भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नगीम यांच्यात झालेला हा सामना कोट्यवधी लोकांनी पाहिला, कित्येक वर्षांपासून हे दोघे एकमेकांविरोधात खेळत आले आहेत.

यावेळी पाकिस्तानच्या अरशद नदीम यांने नीरजला मागे टाकत गोल्ड मेडल पटकावले तर नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल. यास्पर्धेत पहिल्यादांच पाकिस्तानी खेळाडून नीरजला पराभूत केले.

नीरजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला होता. त्यानंतर नीरज चोप्रा हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. प्रसिद्धी मिळाल्यानंतर नीरजच्या संपत्तीमध्ये देखील प्रचंड वाढ झाली होती. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत देखील त्याने सिल्व्हर मेडल जिंकल्यानंतर त्याची नेटवर्थ आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार नीरजची एकूण संपत्ती ४.५ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ३७ कोटी रुपये आहे. नीरज ओमेगा, अंडर आर्मर सारख्या ब्रँड्सचा अँबेसिडर देखील आहे. त्यामुळे येत्या काळात त्याच्या संपत्तीमध्ये आणखी वाढ होइल अशी शक्यता वर्तवली जात आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड जिंकल्यानंतर आनंद महिंद्रांनी नीरज चोप्रा याला खास कस्टमाइज्ड XUV-700 भेट दिली होती.

अर्शद नदीमची नेटवर्थ किती?

नीरजच्या तुलनेत ऑलिम्पिक स्पर्धेतील याशाच्या आधी नदीमची एकूण संपत्ती खूपच कमी होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार नदीमची नेट वर्थ एक कोटीहूनही कमी आहे. अरशद नदीमने पॅरिस ऑलंम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर आता त्याच्या संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते.

पाकिस्तान सरकारकडून त्याला मोठं बक्षिस दिले जात आहे, पाकिस्तानी अभिनेता अली जफरने देखील त्याला १० लाख पाकिस्तानी रुपये देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय सगळीकडून अरशदवर पैशांचा पाऊस पाडला जातोय , त्यामुळे त्याची नेटवर्थ आता वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे अर्शद नदीमला विविध पुरस्कार आणि कॅश अवार्ड्स मिळत असताना, त्याच्या सासरकडून मिळालेलया भेटीची खूप चर्चा झाली. गोल्ड मेडल जिंगल्यानंतर अर्शदच्या सासऱ्यांनी त्याला भेट म्हणून म्हैस देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात अशी भेट देणे परंपरेचा भाग आहे.

नीरजने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये सर्वाधिक ८९.४५ मीटर थ्रो केला होता. तर अरशदने ९२.९७ मीटर भाला फेकून ऑलिम्पिक रोकॉर्ड मोडत गोल्ड मेडल जिंकले. नदीमचा शेवटता थ्रो देखील ९१ मीटरपेक्षा जास्त होता. नदीमच्या रुपाने पाकिस्तानला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वयक्तिक गोल्ड मेडल जिंकता आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संपन्न

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT