Neeraj Chopra Kishore Kumar Jena  esakal
क्रीडा

Neeraj Chopra : हंगामातील सर्वोत्तम फेकीने नीरजनं जिंकलं गोल्ड! सिल्वर जिंकणाऱ्या किशोरनं वाढवलं होतं टेन्शन

In the javelin, Niraj won gold and Kishor won silver for India.

अनिरुद्ध संकपाळ

Neeraj Chopra Kishore Kumar Jena : एशियन गेम्स 2023 मध्ये आज पुरूष भालाफेक स्पर्धेत दोन भारतीयांनी दमदार कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या नीरज चोप्राला भारताच्याच किशोर कुमार जेनाने सुवर्ण पदकासाठी कडवे आव्हान दिले. अखेर नीरज चोप्राने आपली हंगामातील 88.88 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर किशोर कुमार जेनाने देखील आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी (87.54 मीटर) करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

भारताच्या नीरज चोप्राने आपली सुरूवातच जवळपास 87 मीटर लांब भालाफेक करत केली होती. मात्र पंचांनी तांत्रिक कारण देत ही फेकी वैध मानली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा भालाफेक करावी लागली. त्याने पहिल्या 82.38 दुसऱ्या प्रयत्न 84.49 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले होते.

भारताच्याच किशोर कुमार जेनाने पहिल्या प्रयत्नात 82.38, दुसऱ्या प्रयत्नात 84.49 मीटर भालाफेक करत दुसरे स्थान मिळवले होते. मात्र त्याने तिसऱ्या प्रयत्नात 86.77 मीटर भालाफेक करत नीरजला मागं टाकलं. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.

मात्र यानंतर नीरजने आपल्या चौथ्या प्रयत्नात 88.88 मीटर भालाफेक करत आपले अव्वल स्थान आणि सुवर्ण पदकाची दावेदारी पुन्हा मिळवली. त्यानंतर जेनाने पुन्हा एकदा कमाल केली. त्याने आपले काही मिनिटांपूर्वी केलेला वैयक्तिक सर्वोत्तम फेकीचा विक्रम मोडला. त्याने चौथ्या प्रयत्नात 87. 54 मीटर भाला फेकला.

पाचव्या फेकीत जेनाने फाऊल केला तर नीरजने 80.80 मीटर भाला फेकला. सहाव्या फेकीत देखील जेनाचा फाऊल झाला अन् नीरजच्या सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब झाले. नीरजने एशियन गेम्सधील आपले दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT