Neeraj Chopra vs Arshad Nadeem esakal
क्रीडा

Neeraj Chopra Olympic 2024: हक्काचे 'सुवर्ण' ही गेले! नीरज चोप्राचे स्वप्न पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तोडले

Paris Olympic 2024 History Create: टोकियो ऑलिम्पिक भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्याआशियातील पहिल्या खेळाडूचा मान पटकावणाऱ्या नीरज चोप्राने पॅरिसमध्येही इतिहास घडवला. पण, हक्काचे सुवर्ण त्याला जिंकता आले नाही.

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला, परंतु तो 'सुवर्ण'पदकाला मुकला. गुरुवारी पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राच्या 'गोल्डन' कामगिरीकडे आस लावून बसलेल्या चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. १४० कोटी भारतीयांसह नीरजचे 'सुवर्ण' स्वप्न पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या ( Arshad Nadeem) अद्भुत कामगिरीने भंगले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज आपले जेतेपद कायम राखेल असे वाटले होते, परंतु नदीमने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब भाला फेकून ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली.

कडवे स्पर्धक, कडवी टक्कर...

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नीरजने पात्रता फेरीत पहिल्याच फेकीत ८९.३४ मीटर अंतर पार करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये नीरजसमोर अँडरसन पीटर्स ( ग्रेनेडा, ८८.६३ मीटर ), ज्युलियन वेबर ( जर्मनी, ८७.७६ मीटर), अर्शद नदीम ( पाकिस्तान, ८६.५९ मीटर) आणि जुलियस येगो ( केनिया, ८५.९७ मीटर) यांचे कडवे आव्हान असणार होते. गतविजेता नीरजने फायनलमध्ये आठव्या क्रमांकावर भालाफेकीला आला. टोकियोतील रौप्यपदक विजेत्या याकुब व्हॅद्लेचने पहिल्या प्रयत्नात ८०.१५ मीटर भाला फेकला. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८४.७० मीटर भाला फेकून सर्वांना चकित केले.

अर्शद नदीमचा ऑलिम्पिक रेकॉर्ड अन्...

त्रिनिदाद अँड टोबागोच्या केशोर्न वॅलकॉटने ८६.१६ अशी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोदंवली. पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्याच प्रयत्नात अडखळला. जर्मनीचा ज्युलियन वेबरनेही फाऊल केला. नीरजने पहिला भाला दूर फेकला, परंतु तो पडल्याने त्याच्याकडून फाऊल झाला. पहिल्या फेरीत केशोर्न आघाडीवर राहिला. ग्रेनाडाच्या पीटर्सने दुसऱ्या फेरीत ८७.८७ मीटर भाला फेकून इतरांचे टेंशन वाढवले. अर्शद नदीमने ९२.९७ मीटर लांब भाला फेक करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. नीरजला ८९.४५ मीटर लांब भाला फेकता आला आणि तो दुसऱ्या क्रमांकावर सरकला.

Neeraj Chopra

नीरजवर दडपण?

नीरजचा तिसरा प्रयत्नही फाऊल ठरला आणि त्याच्यावरील दडपण प्रकर्षाने जाणवत होते. तीन प्रयत्नांनतर अव्वल ८ खेळाडूच पुढील फेरीसाठी पात्र ठरणारे होते आणि त्यात नदीम, नीरज व याकुब हे अव्वल तीनमध्ये होते. चेझियाच्या याकुबने ८८.५० मीटर भाला फेक करून स्वतःला पदकाच्या शर्यतीत कायम राखले होते. अँडरसन चौथ्या प्रयत्नात ८८.५४ मीटरसह कांस्यपदकाच्या शर्यतीत परतला, परंतु नीरजचा चौथा प्रयत्नही फाऊल ठरला. वेबर ८७.४० मीटर भालाफेक करून पाचव्या क्रमांकावरच राहिला.

शेवटच्या दोन संधी

नीरजला सुवर्णपदक कायम राखण्यासाठी शेवटच्या दोन प्रयत्नात नदीमपेक्षा लांब भाला फेकावा लागणार होता. पण, त्याचा पाचवा प्रयत्नही फाऊल गेला आणि नीरज यामुळे प्रचंड नाराज झालेला पाहायला मिळाला... आता त्याच्याकडे सुवर्ण कायम राखण्यासाठी एकच संधी होती आणि ९३ मीटर मार्क त्याला पार करावेच लागणार होते. नीरजचा ८९.४५ मीटर हा दुसरा प्रयत्न त्याचा या सीझनमधील सर्वोत्तम ठरला. टोकियोतील रौप्यपदक विजेत्या याकुबला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अँडरसन व नीरज यांच्यात रौप्यपदकासाठी टक्कर रंगणार होती, परंतु अँडरसनला ८८.५४ मीटरसह कांस्यवर समाधान मानावे लागले.

नीरज शेवटचा प्रयत्न घेण्यासाठी आला आणि तो ८० मीटरच भालाफेक करू शकला. त्याला रौप्यपदकावर समाधानी रहावे लागले. अर्शदने सुवर्णपदक जिंकले. त्याचा शेवटचा प्रयत्नही ९०.७९ मीटर होता. ऑलिम्पिकमधील पाकिस्तानचे हे मैदानी स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT