Sandeep Lamichhane sakal
क्रीडा

Sandeep Lamichhane : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात माजी कर्णधार दोषी

Kiran Mahanavar

Sandeep Lamichhane News : नेपाळ संघाचा स्टार क्रिकेटर आणि माजी कर्णधार संदीप लामिछानेचे क्रिकेट करिअर धोक्यात आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, नेपाळ न्यायालयाने स्टार फिरकी गोलंदाजाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

एका १७ वर्षीय तरुणीने नेपाळ संघाचा माजी कर्णधार असलेल्या संदीपवर आरोप केला होता की, क्रिकेटरने तिला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेपाळ न्यायालयाने संदीप लामिछानेला दोषी ठरवले आहे. संदीपवर काठमांडू जिल्हा न्यायालयाने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संदीपला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्याची सुनावणीपूर्व कोठडीत रवानगीही केली होती. मात्र, 20 लाखांच्या जामीनावर संदीपची सुटका करण्यात आली होती. बिग बॅश लीग आणि आयपीएलमध्ये खेळलेल्या संदीपला परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासही न्यायालयाने बंदी घातली होती.

संदीप लामिछाने आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला आहे. संदीप 2018 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. संदीपने या लीगमध्ये एकूण दोन हंगामात भाग घेतला आणि एकूण 13 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. तथापि, 2019 पासून कोणत्याही संघाने त्याला आयपीएलमध्ये घेण्यास फारसा रस दाखवला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT