West Indies vs Netherlands Highlights Qualifier : दोन वेळा एकदिवसीय विश्वकरंडक पटकावणाऱ्या वेस्ट इंडीजचा पाय खोलात गेला आहे. नेदरलँडने सोमवारी वेस्ट इंडीजवर सुपर ओव्हरमध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली आणि मोठ्या थाटात सुपर सिक्स फेरीत प्रवेश केला.
पराभवानंतरही वेस्ट इंडीज क्रिकेट संघाला सुपर सिक्स फेरीत प्रवेश करता आला आहे. पण यापुढील त्यांचा मार्ग खडतर असणार आहे. अ गटातून झिम्बाब्वे, नेदरलँड व वेस्ट इंडीज संघाने पुढल्या फेरीत धडक मारली.
आतापर्यंत झालेल्या १२ विश्वकरंडकात वेस्ट इंडीजचा सहभाग राहिला आहे. एवढेच नव्हे तर वेस्ट इंडीजने १९७५ व १९७९मध्ये विश्वकरंडक पटकावण्याची करामतही करून दाखवली आहे. यंदा मात्र त्यांना जर तरच्या समीकरणावर अवलंबून रहावे लागणार आहे. निकोलस पुरनच्या १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने ६ बाद ३७४ धावा फटकावल्या.
नेदरलँडसमोर ३७५ धावांचे मोठे आव्हान होते. पण तेजा निदामानुरु याने १११ धावांची आणि स्कॉट एडवर्डस् याने ६७ धावांची खेळी करीत नेदरलँडच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. नेदरलँडसमोर विजयासाठी अखेरच्या सहा चेंडूमध्ये नऊ धावांची आवश्यकता होती. मात्र अल्जारी जोसेफच्या गोलंदाजीवर आठ धावा काढता आल्या. त्यामुळे लढत बरोबरीत राहिली. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये या लढतीचा निकाल लागला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज ५० षटकांत ६ बाद ३७४ : (अँडन किंग ७६-८१ चेंडू १३ चौकार, जॉन्सन चार्लस ५४-५५ चेंडू, ९ चौकार, १ पटकार, शाय होप ४७-३८ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, निकोलस पूरन नाबाद १०४ -६५ चेंडू १९ चौकार, ६ षटकार, किमो पॉल नाबाद ४६-२५ चेह, ४ चौकार, ३ पटकार, बास डी लीड ६-०-७२-२ शकिव झुल्फिकार ७-०-४३-२).
नेदरलँडस ५० षटकांत ९ बाद ३७४ : (विक्रमजीत सिंग ३०-३२ चेंडू, ५ चौकार, मॅक्स ओ दोद ३६-३६ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, तेजा निदामानुरु १११-७६ चेंडू ११ चौकार, ३ षटकार, स्कॉट एडवर्डस ६७-४७ चेंडू, ६ चौकार, १ पटकार, लॉगन न बीक २८ - १४ चेंडू, ३ चौकार, १ पटकार, अल्झार जोसेफ १०-०-७३-२, रॉस्टन चेस १०- ०-७७-३, अकिल हुसेन १०-०-७२-३)
सुपर ओव्हर नेदरलँडस ६ चेंडूत बिनबाद ३० (लॉगन बॅन बिक नाबाद ३०- ६ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार)
वेस्ट इंडीज ५ चेंडू २ बाद ८ धावा. लॉगन वन बिक ८ धावांत २ विकेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.