SA vs NED esakal
क्रीडा

SA vs NED : नेदरलँडने परंपरा ठेवली कायम; चोकर्सची टी 20 पाठोपाठ वनडेतही केली शिकार

अनिरुद्ध संकपाळ

South Africa Vs Netherlands : वर्ल्डकप 2023 मध्ये आत धरमशाला येथे झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा नेदलँड्सनेच 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 13 धावांनी पराभव करत आयसीसी स्पर्धेत त्यांना मोठा धक्का दिला होता. आता वनडे वर्ल्डकपमध्ये देखील त्यांनी आपली परंपरा कायम ठेवली.

कधीकाळी नेदरलँड्स 5 बाद 82 धावांवर अडकली होती. तेथून कर्णधार स्कॉट एडवर्डने नाबाद 78 धावा करत संघाला 245 धावांपर्यंत पोहचवले.

मात्र हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलँडचा डाव 207 धावात संपवला. नेदरलँडकडून बीकने 3 तर मीकेरेन, मेर्वे आणि लीड्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 43 धावा केल्या.

पावसामुळे सामना उशिरा सुरू झाल्याने तो प्रत्येकी 43 षटकांचा खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दुबळ्या नेदरलँडचा निम्मा संघ 82 धावांवर गारद केला.

मात्र त्यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्डने 69 चेंडूत झुंजार 82 धावा केल्या. त्याने तळातील फलंदाजांसोबत भागीदारी रचत संघाला 245 धावांपर्यंत पोहचवले. बीक (10) मेर्वे (29) आणि आर्यन दत्तने (23) धावा करून त्याला चांगली साथ दिली.

नेदरलँडने आफ्रिकेसमोर 43 षटकात 246 धावांचे आव्हान ठेवले. आफ्रिकेने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते हे आव्हान सहज पार करतील असे वाटले होते. मात्र अवघ्या चार षटकात आफ्रिकेच होत्याचे नव्हते झाले.

त्यांचे बाऊमा (16), डिकॉक (20), मारक्ररम (1) आणि दुसेन (4) चार दिग्गज फलंदाज पाठोपाठ माघारी फिरले. आफ्रिकेची अवस्था 4 बाद 44 धावा अशी झाली असताना मिलर आणि क्लासेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी बीकने फोडली. त्याने क्लासेनला 28 धावांवर बाद केले. त्यानंतर येनसेन 9 धावांची भर घालून परतला.

जेराल्डने 22 धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र तोही फसला. मात्र नेदलँडच्या बीकने आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का हा 31 व्या षटकात दिला. त्याने 43 धावा करून विजयाची आशा कायम ठेवलेल्या मिलरलाच पॅव्हेलियनची वाट धरायला लावली.

रबाडा 9 धावांवर बाद झाल्यानंतर आफ्रिकेची शेवटची जोडी केशव महाराज आणि लुंगी एन्गिडीने आफ्रिकेची गळती थांबवली. मात्र तोपर्यंत आफ्रिकेच्या हातून सामना निसटला होता. अखेर आफ्रिकेला 200 धावांच्या पार पोहचवणारा केशव महाराज 40 धावांवर बाद झाला अन् नेदरलँडने 38 धावांनी सामना खिशात टाकला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT