प्रतिस्पर्धी संघाची उडाली दाणादाण; ३३ धावांत पूर्ण संघ गारद
ICC women's T20 World Cup Europe Qualifiers: नेदरलँड्सच्या (Nederland's) महिला क्रिकेट संघाची गोलंदाज फ्रेडरिक ओव्हरडिक (Frederique Overdijk) हिने टी२० क्रिकेटच्या इतिहासातील (T20 Cricket History) मोठा विक्रम आपल्या नावे केला. पुरूष गोलंदाजांनाही न जमलेला असा भीमपराक्रम (World Record) तिने करून दाखवला. फ्रान्सविरूद्धच्या (France) टी२० क्रिकेट सामन्यात तिने सात (7 Wickets in T20 Match) गडी तंबूत धाडले. टी२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने एका सामन्यात सात गडी बाद केले. आतापर्यंत एका टी२० सामन्यात सहा गडी बाद करण्याचा विक्रम पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारताचा (Team India) दीपक चहर याच्या नावे होता. तर महिलांच्या क्रिकेटमध्ये काही खेळाडूंनी ती किमया केली होती. पण एका सामन्यात सात गडी बाद करण्याचा पराक्रम पहिल्यांदाच करण्यात आला.
युरोपातील वर्ल्ड कप क्वालिफायर फेरीत फेडरिकचा नेदरलँड्स संघ फ्रान्सविरूद्ध मैदानात उतरला होता. त्यावेळी झालेल्या सामन्यात फ्रेडरिकने आपल्या चार षटकांच्या गोलंदाजीत दोन षटके निर्धाव टाकलीच. पण महत्त्वाची बाब म्हणजे, तिने केवळ ३ धावा देत ७ बळी टिपले. तिच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर नेदरलँड्सने फ्रान्सचा १७.५ षटकात केवळ३३ धावांमध्ये धुव्वा उडवला. त्यानंतर नेदरलँड्सने हे आव्हान अवघ्या ३.४ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात पार पाडले.
फ्रेडरिकने गोलंदाजी करताना सात पैकी सहा बळी क्लीन बोल्ड केले. तर एक बळी पायचीत मिळवला. कोणत्याही टी२० क्रिकेट सामन्यात सात गडी मिळवणारी फ्रेडरिक ही पहिलीवहिली खेळाडू ठरली. तिने नेपाळच्या अंजली चंद हिचा विक्रम मोडीत काढला. अंजलीने मालदिव्स विरोधात २०१९मध्ये एकही धाव न देता सहा गडी बाद केले होते.
संक्षिप्त धावफलक: फ्रान्स ३३/१० (पॉपी मॅग्वान -८, फ्रेडरिक ३ धावांत ७ बळी, इवा लीच ३ धावांत १ बळी) विरूद्ध नेदरलँड्स ३४/१ (रॉबिन रिजक नाबाद २१, बॅबेट डी लीड १०, थिया ग्रॅहम ११ धावांत १ बळी)
नेदरलँड्सचा फ्रान्सवर ९ गडी राखून विजय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.