Euro 2024 Netherlands vs Turkey sakal
क्रीडा

Euro Cup 2024 : नेदरलँड्सचे पिछाडीवरून शानदार पुनरागमन! तुर्कस्तानविरुद्ध सहा मिनिटांत दोन गोल, वीस वर्षांनंतर युरो करंडकात उपांत्य फेरी

Kiran Mahanavar

Euro Cup 2024 ­­: तुर्कस्तान एका गोलच्या आघाडीसह युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत धक्कादायक निकालाच्या दिशेने असताना नेदरलँड्सच्या खाती उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोलची नोंद झाली. त्या बळावर डच संघाने वीस वर्षांच्या कालावधीनंतर उपांत्य फेरी गाठली. त्यांनी २-१ फरकाने शानदार विजय मिळविला.

सामेत अकायदिन याच्या भेदक हेडरमुळे तुर्कस्तानला ३५व्या मिनिटास आघाडी मिळाली. नंतरच्या ३५ मिनिटापर्यंत व्हिन्सेन्झो माँटेला यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे वर्चस्व अबाधित होते. सामनावीर ठरलेला बचावपटू स्टेफन दुव्राय याचे ७०व्या मिनिटास हेडिंग भेदक ठरले आणि नेदरलँड्सने बरोबरी साधली.

मेम्फिस डिपाय याच्या क्रॉस पासवर स्टेफनने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चेंडू अडविण्याची संधीच दिली नाही. ७६व्या मिनिटास नेदरलँड्सचा कॉडी गॅक्पो आणि तुर्कस्तानचा मेर्त मूल्डूर यांच्यात चेंडूवरील वर्चस्वासाठी गोलजाळीसमोर चढाओढ राहिली. त्या प्रयत्नात मूल्डूर याने स्वयंगोल केल्यामुळे नेदरलँड्सच्या खाती महत्त्वपूर्ण आघाडी जमा झाली, जी निर्धारित ९० मिनिटांनंतर निर्णायक ठरली. भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटास तुर्कस्तानचा मैदानाबाहेरील खेळाडू बेर्तू यिलड्रिम याला असभ्य वर्तनाबद्दल रेफरीने रेड कार्ड दाखविले.

त्यापूर्वी, भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटास तुर्कस्तानने जवळपास बरोबरी साधली होती, बदली खेळाडू सेमिह किलिसॉय याच्या फटक्यावेळी गोलरक्षक बार्ट व्हरब्रुगन दक्ष राहिल्यामुळे नेदरलँड्सची आघाडी अबाधित राहिली. उपांत्य फेरीत आता नेदरलँड्ससमोर इंग्लंडचे आव्हान असेल. इंग्लिश संघाने अन्य उपांत्यपूर्व लढतीत पेनल्टी शूटआऊटवर स्वित्झर्लंडचे आव्हान ५-३ फरकाने परतावून लावले.

२००४ नंतर प्रथमच अखेरच्या चार संघांत

युरो करंडक फुटबॉल स्पर्धा १९८८ साली जिंकलेल्या नेदरलँड्सने २००४ नंतर प्रथमच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तीन वर्षांपूर्वी त्यांचे आव्हान राऊंड ऑफ १६ फेरीत संपुष्टात आले होते. एकंदरीत नेदरलँड्सने युरो करंडकात उपांत्य फेरी गाठण्याची ही एकूण सहावी वेळ आहे.

संपूर्ण देशासाठी ही खास बाब आहे. आमचा देश छोटा असून आम्ही इंग्लंड, फ्रान्स, स्पेनसह उपांत्य फेरी गाठली असून त्याबद्दल खरोखरच अभिमान वाटत आहे. आजच्या रात्री आम्हाला नुकसान सहन करावे लागले; पण सामने सोपे नाहीत. खेळाडू सर्वस्व ओतून खेळले. ही भावनिक लढत ठरली.

- रोनाल्ड कुमन, नेदरलँड्सचे प्रशिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT