netherlands vs france  euro 2024 netherlands goal disallowed by referee vs france sakal
क्रीडा

Euro 2024 : गोल अवैध ठरल्याने नेदरलँड्स संघाचे नुकसान

गोलशून्य बरोबरी; फ्रान्सला जाणवली एम्बाप्पेची अनुपस्थिती; ग्रीझमनने संधी गमावल्या

सकाळ वृत्तसेवा

लायपझिग : सामन्यातील उत्तरार्धात झावी सिमॉन्स याने केलेला गोल व्हिडीओ असिस्टंट रेफरीद्वारे (व्हीएआर) अवैध ठरला, त्यामुळे भुवया उंचावल्या गेल्या. गोल नाकारल्यामुळे युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ‘ड’ गटात नेदरलँड्सचे फ्रान्सविरुद्ध नुकसान झाले. सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

नेदरलँड्सला विजय हुकला आणि बाद फेरी गाठण्यासाठी अखेरच्या लढतीपर्यंत थांबावे लागले. मागील लढतीत ऑस्ट्रियाविरुद्ध नाकाला दुखापत झालेला फ्रेंच कर्णधार किलियन एम्बाप्पे डचांविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत बाकावर बसून राहिला.

त्याची गैरहजेरी माजी विजेत्यांना प्रकर्षाने जाणवली. एम्बाप्पेच्या अनुपस्थितीत नेतृत्व केलेल्या आंतोन ग्रीझमन याने मिळालेल्या सोप्या संधी वाया घालविल्या. त्यामुळे वारंवार नेदरलँड्सच्या गोलक्षेत्रात आक्रमण केलेल्या फ्रान्सला बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघांचे आता प्रत्येकी चार गुण झाले असून अखेरच्या साखळी लढतीत बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना बरोबरीचा एक गुणही पुरेसा असेल.

व्हीएआरबाबत संशय

सामन्याच्या ६९ व्या मिनिटास नेदरलँड्सच्या सिमॉन्सच्या फटक्याने फ्रान्सचा गोलरक्षक माईक मेयनॉ याला चकवा दिला, तेव्हा स्टेडियमवरील द ऑरेंज पाठीराख्यांनी जोरदार जल्लोष केला. मात्र नंतर व्हीएआर निर्णयानुसार गोल अवैध ठरला.

अगोदर लाईन्समनने गोल ऑफसाईड असल्याने झेंडा दाखविला, पण नंतर व्हीएआर प्रक्रियेत दीर्घ चर्चेनंतर डच खेळाडू डेन्झेल डमफ्रीस फटक्याच्या वेळेस गोलरक्षकाला अडथळा (दृष्टीसमोर उभा राहिल्याने) आणल्याबद्दल गोल नाकारण्यात आला. ‘‘मी मागून जे पाहिले त्यावरून आमचा गोल वैध होता,’’ अशी प्रतिक्रिया डच कर्णधार व्हर्जिल व्हॅन डायक याने सामन्यानंतर दिली.

पोलंड स्पर्धेतून बाहेर

बर्लिन येथे झालेल्या ‘ड’ गट लढतीत ऑस्ट्रियाने पोलंडला ३-१ फरकाने हरविले. हुकमी खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्की उत्तरार्धात मैदानात उतरला, तरीही पोलंडला गटात सलग दुसरा सामना गमवावा लागला. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर गेलेला पोलंड पहिला संघ ठरला.

ऑस्ट्रियासाठी नवव्या मिनिटास जेर्नोट ट्राऊनर याने पहिला गोल केला. नंतर ख्रिस्तोफ बॉमगार्टनर याने ६६ व्या, तर मार्को अर्नोटोविच याने पेनल्टीवर ७८ व्या मिनिटास गोल करून ऑस्ट्रियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘ड’ गटात आता नेदरलँड्स व फ्रान्सचे प्रत्येकी ४, तर ऑस्ट्रियाचे तीन गुण आहेत. अखेरच्या फेरीत नेदरलँड्स व ऑस्ट्रिया यांच्यात, तर फ्रान्स व पोलंड यांच्यात लढत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT