Subroto Football Tournament esakal
क्रीडा

Subroto Football Tournament : जादा वयाचा खेळाडू आढळल्यास फुटबॉल संघ होणार स्पर्धेतून बाद; कोणते आहेत नवे नियम?

देशातील कुमार फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देणारी सुब्रोतो स्पर्धा यंदापासून नव्या स्वरुपात होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुब्रोतो मुखर्जी स्पोर्टस् एज्युकेशन सोसायटीतर्फे जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय अशा स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी सुमारे ३४ हजारहून अधिक शालेय संघ सहभागी होतात.

गडहिंग्लज : देशातील कुमार फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देणारी सुब्रोतो स्पर्धा यंदापासून नव्या स्वरुपात होणार आहे. यावर्षी १४ ऐवजी ही स्पर्धा १५ आणि नेहमीच्या १७ वर्षांखालील गटात अनुक्रमे बंगळूर आणि दिल्लीला होईल. संघांना ऑनलाईन नोंदणी (Online Registration) करावी लागणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सर्व खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली जाईल. यात एखादा जादा वयाचा खेळाडू आढळल्यास संपूर्ण संघ स्पर्धेतून बाद करून त्यावर कडक कारवाई होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे वय चोरीला लगाम बसण्याची अपेक्षा आहे.

देशातील सर्वांत जुनी म्हणून सुब्रोतो शालेय स्पर्धा (Subroto Football Tournament) ओळखली जाते. भारतीय वायुदलाचे मार्शल सुब्रतो मुखर्जी यांनी सन १९५८ मध्ये या स्पर्धेचा श्रीगणेशा दिल्लीत केला. सन १९६० पासून ही स्पर्धा त्यांच्याच नावाने ओळखली जाऊ लागली. सुरुवातीला केवळ १७ वर्षांसाठी असणाऱ्या स्पर्धेत सन १९५८ पासून चौदा १४ गटाची भर पडली. सन २०१२ पासून मुलींची स्पर्धा सुरू झाली. सन २०१३ पासून परदेशातील शालेय संघही सुब्रोतो मुख्य स्पर्धेत सहभागी होत आहेत.

सुब्रोतो मुखर्जी स्पोर्टस् एज्युकेशन सोसायटीतर्फे जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय अशा स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी सुमारे ३४ हजारहून अधिक शालेय संघ सहभागी होतात. यंदाच्या ६३ व्या अध्यायात १४ ऐवजी १५ वर्षे गटात ही स्पर्धा होईल. १५ वयोगटासाठी १ जानेवारी २०१०, १७ साठी १ जानेवारी २००८ आणि पुढे असा जन्मतारखेचा निकष आहे.

मुख्य स्पर्धा ३० जुलै ते ११ सप्टेंबरअखेर १५ वर्षांखालील बंगळूरला, तर सतराची दिल्ली येथे होईल. यामुळे १० जुलैपूर्वी जिल्हा आणि विभागीय स्पर्धा घेण्याच्या सूचना आहेत. यंदा सहभागी सर्वच संघांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेवेळी मुखर्जी सोसायटीचा निरीक्षक उपस्थित राहणार आहे. मुख्य स्पर्धेत खेळाडूंची टॅनर व्हाईटहाऊश (टीडब्लू ९) ही वैद्यकीय चाचणी होईल. यात एखादा जरी खेळाडू जादा वयाचा आढळल्यास संघ बाद करून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

त्यासाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालकांनी खेळाडूंची काळजीपूर्वक खात्री करावी, असे आदेश क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिले आहेत. यामुळे वय चोरीच्या घटनांमुळे प्रतिभावंत खेळाडूंवर होणाऱ्या अन्यायाला लगाम बसेल, अशी अपेक्षा फुटबॉल वर्तुळात आहे.

प्रवेश शुल्काचा भुर्दंड

सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला दोन हजार रुपये प्रवेश शुल्क ऑनलाईन नोंदणीवेळी भरावे लागणार आहे. मुळातच शाळांचे वेतनेतर अनुदान रखडल्याने पदरमोड करून सहभागी व्हावे लागते. त्यातच यंदापासून प्रवेश शुल्काचा भुर्दंड वाढणार आहे. परिणामी, जिल्हास्तरावरील सहभागी संघांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT