वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 21 फेब्रुवारीपासून होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने आज आपला तगडा संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या केली जेमीसनला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. गेल्यावर्षी लोकी फर्ग्युसनला दुखापत झाल्याने त्याला कसोची संघात स्थान देण्यात आले होते मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेमीसनने चांगली कामगिरी केली आहे,
न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टनेसुदुधा कसोटी संघात पुनरागमन केले आहे. 'बॉक्सिंग डे' ला झालेल्या सामन्यात त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्याच्या पुनरागमनामुळे किवींच्या गोलंदाजीला आणखी धार येईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जालेल्या मालिकेत मिळालेला व्हाइटवॉश विसरुन ते आता जोमात कामगिरी करण्यासाठी सज्ज असतील.
त्याच्या जोडीला टीम साउदी आणि नील वॅगनर हे दोघे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. न्यूझीलंडने त्यांचा फिरकी गोलंदाज मिशेल सँटनरला संघातून वगळण्यात आले आहे. त्याने 2019-2020 या मोसमात चार कसोटींमध्ये फक्त पाच विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरी केल्याने सलामीवीर जीत रावल आणि वेगवान गोलंदाज मॅट हेन्री यांनाही संघातून वगळण्यात आले आहे.
न्यूझीलंडचा संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉन लॅथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॅटलिंग, कॉलीन डी ग्रॅंडहोम, टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, अजाझ पटेल, केली जेमीसन, डॅरिल मिशेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.