Nigerian Chess Player : नायजेरियाचा बुद्धीबळपटू टुन्डे ओनाकोयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नायजेरियन बुद्धीबळपटू हा एकाचवेळी 10 बुद्धीबळपटूंविरूद्ध खेळताना दिसतोय अन् विशेष म्हणजे त्याने या 10 खेळाडूंना पराभूत केलं.
हा एक विरूद्ध दहा जणांचा सामना हा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे गोळा करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे ओनाकोयाने सांगितले. हा एक विरूद्ध दहा जाणांचा सामना हा जवळपास 2 तास चालला. ओनाकोयाने या सामन्यात आपल्या बुद्धीबळाचे कौशल्य दाखवून दिलं. तो प्रत्येक चेस बोर्ड टेबलवर फिरत होता आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला आव्हान देत होता. तो हळूहळू विजयाकडे कूच करत होता.
ओनाकोयाने एक्सवर (ट्विटर) व्हिडिओ पोस्ट करत त्याला कॅप्शन दिलं की, 'डीएलडी कॉन्फरन्समधील दुसऱ्या दिवशी मी एकाचवेळी 10 बुद्धीबळपटूंविरूद्ध खेळलो. जवळपास दोन तासाच्या सामन्यांमध्ये मी सर्व सामने जिंकण्यात यशस्वी ठरलो. हे बुद्धीबळपटूंचे प्रदर्शन आमच्या अकॅडमीत 100 मुलांच्या शिक्षणासाठी निधी उभारण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.'
नायजेरियन चेस प्लेअर्स फाऊंडेशनने मुलांच्या शिक्षणासाठी निधी उभारला जावा यासाठी हा उपक्रम राबवला होता. ही एनजीओ चेसच्या माध्यमातून समाजात चांगला बदल करणे आणि गरीब मुलांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना चेसमधील स्किल्स देखील शिकवली जात आहेत. या माध्यमातून हा संस्था मुलांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी गुरूमंत्र दिला जाईल.
ओनाकोयाने हा उपक्रम राबवून अपेक्षित रिझल्ट मिळवला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ओनाकोया हा बुद्धीबळाच्या माध्यमातून समाजात बदल करण्याबाबत साकरात्मक आहे. त्याच्या या उद्येशाला सोशल मीडियावर तर चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे त्याचा विश्वास दुणावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.