Nishant Dev Paris Olympics 2024 sakal
क्रीडा

Nishant Dev : बॉक्सिंगमध्ये पुन्हा राडा! भारतीय बॉक्सर निशांत देवसोबत झाली चीटिंग? चाहते संतापले

Kiran Mahanavar

Indian Boxer Nishant Dev Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतीय बॉक्सर निशांत देवचा प्रवास आता संपला आहे. शनिवारी नॉर्थ पॅरिस एरिना येथे पुरुषांच्या 71 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिकोच्या मार्को वर्दे अल्वारेझकडून त्याचा पराभव झाला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चाहत्यांच्या मते, पंचांनी भारतीय बॉक्सर निशांत देवसोबत चीटिंग केली आहे.

पुरुषांच्या 71 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय बॉक्सर निशांत देव संपूर्ण सामन्यात विरोधी संघावर वर्चस्व गाजवत होता. पहिल्या दोन फेरीतही गुण त्याच्या बाजूने होते पण शेवटच्या फेरीत मेक्सिकोच्या खेळाडूने चांगले पुनरागमन केले. पण, अंतिम निकाल निशांतच्या बाजूने लागेल असे वाटत होते परंतु पंचांनी स्प्लिट निर्णय घेत मेक्सिकन बॉक्सरला 4-1 ने विजेता घोषित केले.

निशांत देवसोबत झाली चीटिंग?

भारतीय बॉक्सर निशांत देव पहिला ऑलिम्पिक खेळत होता. त्याचा उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास उत्कृष्ट होता. या सामन्यातही त्याने विरोधी खेळाडूंवर वर्चस्व कायम राखले होते. अल्वारेझ बहुतेक फेरीत पिछाडीवर होता, परंतु अंतिम फेरीत त्याने निशांतच्या चेहऱ्यावर उजवा हुक मारला. या फेरीनंतर मेक्सिकन बॉक्सर्स 3-2 ने आघाडीवर होते, पण एकूण संख्या पाहिल्यास निशांत पुढे होता. यानंतर जेव्हा अंपायरने स्प्लिट निर्णयानुसार आपला निर्णय दिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

निशांत पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडणारा पाचवा भारतीय बॉक्सर ठरला आहे. तिच्या बाहेर पडल्याने आता भारतीय चाहत्यांची एकमेव आशा टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेन हिच्याकडे आहे. दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या चिनी बॉक्सर ली कियानचा सामना लोव्हलिनाशी होणार आहे. आशियाई क्रीडा 2022 च्या अंतिम फेरीत कियानने लोव्हलिनाचा 5-0 असा पराभव केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT