Deepti Sharma biggest no ball after Bumrahs  Sakal
क्रीडा

टीम इंडियावर तिसऱ्यांदा नो बॉलच ग्रहण; बुमराहनंतर दिप्तीची चूक

सुशांत जाधव

दिप्ती शर्माच्या (Deepti Sharma) नो बॉलमुळे (NO Ball) भारतीय महिला संघाचा (India Womens) वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात संपुष्टात आला. कोणताही गोलंदाज जाणीवपूर्वक नो बॉल टाकत नसला तरी ही चूक कायम मनात सलत राहिल हे निश्चित. आयसीसीच्या स्पर्धेत नॉक आउट स्टेजमध्ये भारतीय संघाला नो बॉलमुळे ग्रहण लागण्याची ही पहिली वेळ नाही. भारतीय क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे. फरक एवढाच आहे की पहिल्या दोन वेळेस भारतीय पुरुष संघाने चूक केली होती आता ती चूक महिला संघाकडून झालीये. (Deepti Sharma biggest no ball after Bumrahs)

2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील दोन नो बॉल पडले होते महागात

2016 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला वेस्ट इंडीज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आर. अश्विन आणि हार्दिक पांड्यानं या मॅचमध्ये सिमन्सला दोन नो बॉल टाकले. या दोन्ही नो बॉलला सिमन्स बाद झाला होता. पहिल्यांदा तो 18 धावांवर तर दुसऱ्यांदा तो 50 धावांवर खेळत होता. या सामन्यात सिमन्सन 82 धावांची खेळी करत संघाला फायनलमध्ये नेले होते.

बुमराहनं पाकविरुद्ध फायनलमध्ये केली होती चूक

2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही जसप्रीत बुमराहनं अशीच चूक केली होती. पाकिस्तानचा फलंदाज फकर जमान 3 धावांवर असताना बुमराहनं त्याला बाद केले. पण तो नो बॉल पडला. या संधीच सोन करत फकर झमान याने 114 धावांची खेळी करत पाकिस्तानला स्पर्धा जिंकून दिली होती.

दिप्ती शर्माचा नो बॉल स्पर्धेतून थेट बाहेर टाकणारा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अटितटिच्या लढतीत शेवटच्या षटकात मितालीनं चेंडू दिप्तीच्या हाती सोपवला. या षटकात दिप्तीनं अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत रन आउटच्या स्वरुपात एक विकेटही घेतली. पण नो बॉलन खेळ पलटला. 2 चेंडूत तीन धावांची गरज असताना तिने नो बॉल टाकला. दक्षिण आफ्रिकेला एक धाव आणि एक अवांतर चेंडू मिळाला. याचा फायदा उठवत आफ्रिकेनं बाजी मारली. या पराभवासह टीम इंडियाचा स्पर्धेतील प्रवासही संपुष्टात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT