Sachin Tendulkar Gold Ticket News : पाच ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप 2023चा थरार रंगणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा पुढाकार घेतला. ज्यामध्ये बोर्डने भारतातील आयकॉन्सना खास तिकिटे देण्याची योजना आखली आहे. त्याला 'गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स' असे नाव देण्यात आले आहे.
या अंतर्गत बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना पहिले गोल्डन तिकीट देण्यात आले. आता सचिन तेंडुलकरलाही हे तिकीट देण्यात आले आहे.
बीसीसीआयने एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सचिनसोबत जय शहा दिसत आहे. जय शहा यांनी सचिनला गोल्डन तिकीट दिले आहे. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, देश आणि क्रिकेटसाठी खास क्षण. गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स कार्यक्रमांतर्गत, बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनी भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट प्रदान केले.
वर्ल्ड कपमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा
2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सचिन एक भाग होता. क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेतील त्याचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. त्याला 1992 ते 2011 दरम्यान सहा वेळा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.
त्याने 45 सामन्यांच्या 44 डावात 2278 धावा केल्या आहेत. सचिनची सरासरी 56.95 आहे. त्याने सहा शतके आणि 15 अर्धशतके केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.