ODI WC Qualifier 2023 | Gajanand Singh | West Indies vs USA 
क्रीडा

ODI WC Qualifier 2023: पदार्पणाच्या सामन्यात वडिलांना गमावलं पण शतक ठोकून केलं स्वप्न पूर्ण अन्...

Kiran Mahanavar

ODI World Cup Qualifier 2023 : विश्वचषक पात्रता सामने झिम्बाब्वेमध्ये खेळले जात आहेत. या स्पर्धेतून दोन संघांचे यंदा भारतात विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. रविवारी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिला दिवसच उत्साहाने भरला. सलग 2 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला अमेरिकेने अडचणीत आणले होते.

अमेरिकेचा फलंदाज गजानंद सिंगने सहाव्या क्रमांकावर येऊन वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद शतक ठोकले. एकेकाळी गजानंद यूएसएला विजय मिळवून देतील असे वाटत होते. पण त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. अन्यथा क्वालिफायरच्या पहिल्याच दिवशी उलतापालथ पाहिला मिळाली असती.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत. कॅरेबियन संघ 49.3 षटकांत सर्वबाद 297 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्स, शाई होप, रोस्टन चेस आणि जेसन होल्डर या चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात अमेरिकेने 100 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. पण गयानामध्ये जन्मलेला 35 वर्षीय डावखुरा फलंदाज गजानंद सिंगने अमेरिकेची धडाकेबाज खेळी सांभाळण्याचे काम केले.

गजानंद सिंगने श्याम जहांगीरसोबत सहाव्या विकेटसाठी नाबाद 76 धावांची आणि नंतर एनपी केंजिंगसोबत 8व्या विकेटसाठी नाबाद 76 धावांची भागीदारी करून अमेरिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजच्या तगड्या गोलंदाजीमुळे अमेरिकन संघ 50 षटकांत 7 विकेट गमावून 258 धावा करू शकला आणि सामना 39 धावांनी गमावला. मात्र गजानंद सिंगने 109 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी केली.

पहिले शतक वडिलांना समर्पित : गजानंद

गजानंदचे हे पहिले एकदिवसीय शतक आहे आणि त्याने हे शतक आपल्या वडिलांना समर्पित केले, जे आता या जगात नाहीत. मी माझ्या वडिलांसाठी हे केले आहे, असे गजानंदने सामन्यानंतर सांगितले. दोन वर्षांपूर्वी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांचे निधन झाले. हे शतक माझ्यासाठी खूप खास आहे. गजानंदचा जन्म गयानामध्ये झाला असून तो वेस्ट इंडिजच्या अंडर-19 संघाकडून खेळला आहे. पण वरिष्ठ संघासोबत खेळता न आल्याने तो अमेरिकेत गेला आणि आता तो यूएसए संघासोबत खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT