Oliver Whitehouse 12-year-old claims double hat-trick in one over English cricket news in marathi kgm00 
क्रीडा

Cricket Records: 2 षटके 0 धावा 8 विकेट्स! क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारा हा इंग्लिश खेळाडू आहे तरी कोण?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ! गोलंदाजाने सलग 6 चेंडूत घेतल्या 6 विकेट

Kiran Mahanavar

Cricket Records : क्रिकेटमध्ये रोज मोठमोठे रेकॉर्ड बनतात आणि मोडतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षण... क्रिकेटच्या मैदानावर दिवसभर काही ना काही तरी पराक्रम करतात. अलीकडेच एका युवा गोलंदाजाने असा विक्रम केला आहे ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. एका गोलंदाजाने आपल्या षटकातील प्रत्येक चेंडूवर विकेट घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाला हॅटट्रिक घेणे म्हणजेच सलग तीन विकेट्स घेणे खूप अवघड असते. पण ऑलिव्हर व्हाईटहाऊस या 12 वर्षीय इंग्लिश गोलंदाजाने आपल्या षटकातील प्रत्येक चेंडूवर विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे. म्हणजेच या गोलंदाजाला एकाच षटकात दुहेरी हॅट्ट्रिक घेण्यात यश आले.

या सामन्यात ऑलिव्हर व्हाइटहाऊसने दोन षटके टाकली. त्याच्या दोन्ही षटकांत फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. त्याचबरोबर त्याने एकूण 8 विकेट्स घेतल्या. मात्र तो आंतरराष्ट्रीय सामना नव्हता, त्यामुळे ऑलिव्हरला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. या सामन्यात ऑलिव्हर ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबकडून खेळत होता.

ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक ऑलिव्हरची कामगिरी पाहून आश्चर्यचकित झाले. ते म्हणाला की अशी कामगिरी पाहून माझा अजून विश्वास बसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT