Paris Olympics: 100 वर्षांनी ऑलिम्पिक पॅरिसमध्ये, जाणून घ्या कसा झाला खेळात बदल Sakal
क्रीडा

Paris Olympics: 100 वर्षांनी ऑलिम्पिक पॅरिसमध्ये, जाणून घ्या कसा झाला खेळात बदल

सकाळ डिजिटल टीम

रोहिणी गोसावी

पॅरिसचं ऑलिंपिक अनेक गोष्टींमुळं सतत चर्चेत आहे, खरंतर ऑलिंपिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धा भरवणं हे कोणत्याही देशासाठी अभिमानाचीच गोष्ट असते आणि त्याबरोबरच जबाबदारीचीही, या स्पर्धांवर अनेक देशांची राजकीय आर्थिक गणितंही ठरत असतात, त्यामुळे यजमान देशांच्या अर्थव्यवस्थेसाठीही ही स्पर्धा अनेक पातळ्यांवर महत्त्वाची ठरते. फ्रान्स तिसऱ्यांदा ऑलिंपिक स्पर्धांचं यजमानपद भूषवतोय. पॅरिसमध्ये १९०० आणि १९२४ मध्ये याआधीच्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्यात आणि त्यानंतर बरोब्बर १०० वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्सला स्पर्धेचं यजमानपद मिळालंय. या १०० वर्षांत जगानं आधुनिकतेकडं झपाट्यानं वाटचाल केली, तसे या स्पर्धांमध्येही आमूलाग्र बदल झाले.

ऑलिंपिक क्रीडानगरी

ऑलिंपिक स्पर्धेत पूर्वी सगळ्या खेळाडूंना एकत्र राहण्याची सोय नव्हती, तशी सोय असावी, असा विचार करत फ्रेंच प्रशासनाने १९२४च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी सगळ्या खेळाडूंना एकाच ठिकाणी राहण्याची तात्पुरती सोय केली आणि त्या ठिकाणाला ऑलिंपिक व्हिलेज असं नाव देण्यात आलं. त्यानंतर १९३२ मध्ये लॉस एन्जेलिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पहिल्यांदा मॉडर्न ऑलिंपिक व्हिलेज तयार करण्यात आलं.

समारोप आणि राष्ट्रध्वज

१९२४च्या ऑलिंपिक उद्घाटन समारंभात परेड ऑफ नेशनच्या दरम्यान खेळाडूंनी पहिल्यांदा आपले राष्ट्रध्वज घेऊन मार्चिंग केलं आणि त्याच स्पर्धांमध्ये उद्घाटन समारंभासारखाच समारोप समारंभाची प्रथा सुरू झाली.

२०२४चे हे ऑलिंपिक तर इतिहासाला कलाटणी देणारं ठरणार आहे, शहरात येणाऱ्या दीड कोटीहून जास्त पर्यटकांना सांभाळत आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धाही शाश्वत विकासाचं मॉडेल होऊ शकतात हे या स्पर्धांतून सिद्ध होणार आहे.

खेळाडू तंत्रज्ञान, सुरक्षा व्यवस्था या सगळ्याच दृष्टीने या स्पर्धा बदलल्या. तरीही १९२४ आणि २०२४च्या स्पर्धांमध्ये अनेक बाबतीत साधर्म्यही आहे. १९१८ मध्ये पहिलं महायुद्ध संपल्यानंतर १९२४ चे ऑलिंपिक हे त्यातून सावरण्याच्या काळात झालं होतं तसंच आताही २०२० मध्ये आलेल्या कोरोनातून सावरण्याच्या काळात आणि सुरू असलेल्या युद्धाच्या सावटाखाली २०२४च्या स्पर्धा होताहेत.

स्पर्धांचं स्वरूप कितीही बदललं तरीही त्यातून जगभरातील खेळाडूंना मिळणारी ऊर्जा, प्रोत्साहन आणि जागतिक ओळख हीच अशा प्रकारच्या स्पर्धांची खरी कमाई असते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT