Swapnil Kusale Pramotion central reailway esakal
क्रीडा

Swapnil Kusale Promotion : ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेचं प्रमोशन! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती

Central Railway Promotion Swapnil Kusale पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिले.

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Live Update : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने ( Swapnil Kusale) याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिले. मनु भाकर हिच्यानंतर पॅरिसमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ३ पदक जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ ठरली... १९५२ नंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी कुस्तीतील पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल तीन पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. कुसळेने एकूण ४५१.४ गुण मिळवत तिसरे स्थान पटकावत देशाला आणखी एक पदक मिळवून दिले. स्वप्नीलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने त्याला १ कोटींची पारितोषिक जाहीर केले. त्यानंतर मध्य रेल्वेनेही त्याचे प्रमोशन केले.

स्वप्नील कुसाळे हा मध्य रेल्वेत २०१५ पासून तिकिट कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्याचे वडील आणि भाऊ जिल्ह्याच्या शाळेत शिक्षक आहेत आणि आई गावची सरपंच आहे. पण, आजच्या ऑलिम्पिक पदकानंतर त्याला बढती मिळाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या आधारे कुसाळे याची मुंबईतील ओएसडी, स्पोर्ट्स सेल म्हणून ( OSD, Sports Cell in Mumbai) पदोन्नती करण्यात आली आहे, असे सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले.

त्याच्या कामगिरीबद्दल तो म्हणाला, आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मला शूटिंग आवडते आणि मला खूप आनंद आहे की मी इतके दिवस ते करू शकलो. मनु भाकर यांना पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. ती जिंकू शकली तर आपणही जिंकू शकतो.

स्वप्नीलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर वडील सुरेश कुसाळे म्हणाले, मला खात्री होती, स्वप्नील पदक जिंकेल. गेल्या १२-१३ वर्षांची तपश्चर्या कामी आली. त्याने भारताचा तिरंगा फडकवला याचा मला अभिमान आहे. आई अनिता कुसाळे यांनीही खूप आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू भरून आले होते. स्वप्नीलच्या आजच्या सामन्यापूर्वी आई-वडिलांनी ग्रामदेवतेला अभिषेक केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT