nisha dhahiya esakal
क्रीडा

Nisha Dahiya Cry: खुब लढी! एल्बो डिस्लोकेट होऊनही निशा दहिया लढली; विजयी आघाडीनंतरही हरल्यावर ढसाढसा रडली Video

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 wrestling Nisha Dahiya Injury : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कुस्तीपटू निशा दहियाच्या लढाऊ बाण्याने जगाचे मन जिंकले. सामन्यात विजयी आघाडी असताना निशा मॅटवर जोरात आदळली, त्यात तिचा कोपर निखळले... तिने त्वरित वैद्यकीय मदत मागितली आणि तिला माघार घेण्याचा सल्ला दिला गेला होता. पण, तिने स्पष्ट नकार दिला व पुन्हा मॅटवर उतरली. प्रतिस्पर्धीला सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवण्याची ही आयती संधी होती. सामन्यानंतर तिनेही निशाचे कौतुक केले. मात्र, निशाच्या डोळ्यांत पदक गेल्याची खंत प्रकर्षाने जाणवली. ती धायमोकलून रडू लागली आणि तिला रडताना पाहून भारतीयांचे मनही भावनिक झाले.

भारतातील पहिली कुस्तीपटू निशा दहियाने ६८ किलो फ्री स्टाइल स्पर्धेच्या पहिल्या फेरीत शानदार विजय नोंदवला आणि उपांत्यपूर्व फेरीत तिने ८-२ अशी आघाडी घेतली होती. पण, सामन्याच्या शेवटच्या क्षणी तिच्या एल्बो डिस्लोकेट झाला. असे असूनही निशाने मैदान सोडले नाही आणि लढत सुरूच ठेवली, परंतु कोरियन कुस्तीपटू पाक सोल गमने हा सामना १०-८ ने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली.

निशा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोरियन खेळाडू विरुद्ध खूप मजबूत दिसत होती आणि ८-१ ने आघाडीवर होती. जेव्हा सामना संपायला ३३ सेकंद बाकी होते. त्यानंतर निशाला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओ मॅटवर आले आणि निशाच्या दुखापतीचा आढावा घेतला. निशाला वाटले की सामन्यात ३३ सेकंद शिल्लक आहेत आणि बचावात्मक खेळ करून आपणी ही आघाडी कायम राखू शकतो, असे तिला वाटले. मात्र याचा फायदा घेत कोरियाच्या कुस्तीपटूने शेवटच्या क्षणापर्यंत १०-८असा विजय मिळवला.

निशाने पहिल्या लढतीत युक्रेनच्या टेटियाना सोव्हाचा ६-४ असा पराभव केला होता आणि ती अद्याप ऑलिम्पिकमधून बाहेर पडलेली नाही. निशाला पराभूत करणारी कोरियाची कुस्तीपटू फायनलमध्ये गेली तर रेपेचेज फेरीत निशाला पुन्हा पुढे येण्याची संधी मिळू शकते.

निशाने २०२२ मध्ये तिच्या गुडघ्याला ACL दुखापत झाली होती, त्यानंतर २०२३ मध्ये तिच्या कॉलरचे हाड तुटले होते आणि निशाला दोन महिने बेड रेस्ट घ्यावी लागली होती. मात्र, तरीही निशाने हार मानली नाही आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai University Senate Election 2024 Result: सिनेट निवडणुकीत युवासेनेचा सर्व 10 जागांवर दणदणीत विजय

Latest Maharashtra News Updates : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन आज बंद राहणार, काय आहे कारण?

Sakal Editorial Article : अग्रलेख - विकृतीला पायबंद

Sakal Editorial Article : भाष्य - अमेरिकी निर्बंधांचे 'औषध'

Sakal Editorial Article : हौस ऑफ बांबू - 'पुरुषोत्तम' साठीचा झाला नव्हं..!

SCROLL FOR NEXT