olympic champion neeraj chopra javelin thrower 90 metre mark sakal
क्रीडा

Neeraj Chopra : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचं 2023 मध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडण्याचं ध्येय

टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदकानंतर गेल्या वर्षी त्याने जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले

सकाळ वृत्तसेवा

बुडापेस्ट : सात वर्षांपूर्वी ज्युनिअर विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यापासून भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कायमच पदकाचा वेध घेतला आहे. असे असले तरी भालाफेकीतील ९० मीटर हा जादुई आकडा त्याला अद्याप गाठता आलेला नाही. तो म्हणतो, निश्चितच ९० मीटरचे माझे लक्ष्य असून एक चांगला दिवस आणि फेक करण्यासाठी पोषक हवामान मिळाले, तर हा जादुई आकडा मी गाठला, असे समजाच.

टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदकानंतर गेल्या वर्षी त्याने जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. टोकियोनंतर स्टॉकहोम येथील डायमंड लीगमध्ये त्याने ८९.९४ मीटर फेक करून लवकरच ९० मीटर गाठू, असे संकेत दिले होते; मात्र अजूनही हा आकडा त्याला हुलकावणी देत आहे. ‘जिओ सिनेमा’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, मी ९० मीटरच्या जवळ आहे.

गरज आहे ती एका चांगल्या दिवसाची आणि पोषक हवामानाची. असे झाले, तर लक्ष्य गाठण्याचा विश्वास आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एकदा अपेक्षांचे ओझे नीरजच्या खांद्यावर आहे. याविषयी तो म्हणाला, अशा अपेक्षा किंवा दबावाची आता सवय झाली आहे. कारण दर दोन किंवा चार वर्षांनी तुम्ही एखाद्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता. त्या वेळी तुमच्यावर एकप्रकारची जबाबदारी असते.

भालाफेकीतील भारतीय स्पर्धक

नीरज चोप्रा, डीपी मनू, किशोर जेना

प्राथमिक फेरी (२५ ऑगस्ट)

दुपारी १.४०

अंतिम फेरी (२७ ऑगस्ट)

रात्री ११.४५

दुखापतीनंतरचे यश

यंदा दुखापतीमुळे त्याला एक महिना विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळेच त्याने आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतून माघार घेतली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर लुसान डायमंड लीगमध्ये अव्वल स्थान मिळविले असले, तरी त्याची फेक त्याच्या दहा सर्वोत्तम फेकीपेक्षा कमी होती; तरीही त्याने आपले वर्चस्व कायम ठेवले. सर्वोच्च पातळीवर जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत स्पर्धा करताना सातत्य ठेवणे फारच आव्हानात्मक आहे, असे तो म्हणाला.

जागतिक स्पर्धेत सहभागी होताना आणि मला सर्वोत्तम कामगिरी करायची ही जाणीव असल्याने मानसिकदृष्ट्या कणखर असणे खूप गरजेचे आहे. कुठलेही अंतर किंवा पदकाचा रंग विचारात घेऊन मी स्पर्धेत सहभागी होत नाही. मला फक्त सर्वोत्तम कामगिरी करायची आहे आणि ते झाले तर मी पूर्वीपेक्षा अधिक चांगला निकाल देऊ शकेल.

- नीरज चोप्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात? मतदारांना गोंजारण्यासाठी घेतल्या बैठका, कोण ठरणार वरचढ?

Accident : भरधाव इको कारची ट्रकला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्याआधी भारतीय संघातील सराव सामना का महत्त्वाचा? कोचनेच केला खुलासा

आधी मनसे आता भाजप? महायुतीला मत द्या म्हटल्याने सायली संजीव ट्रोल; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं

SCROLL FOR NEXT