Swapnil Kusale esakal
क्रीडा

Swapnil Kusale Reward: स्वप्नील कुसाळेला १ कोटी मिळणार कधी? महाराष्ट्र सरकारने घोषणा केली, बातम्या आल्या पण...

Swadesh Ghanekar

Maharashtra Government Swapnil Kusale reward of ₹1 crore : नेमबाज स्वप्नील कुसाळे याला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून जवळपास दोन महिने होत आली आहेत... त्याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून स्वप्नीलला १ कोटी बक्षीस जाहीर केले गेले, पण टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अद्याप स्वप्नीलला ही बक्षीस रक्कम मिळालेली नाही किंवा त्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून अधिकृत बोलणंही झालेलं नाही.

१९५२च्या हेलसिंकी स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंना ऑलिम्पिक पदक जिंकता आले नव्हते, परंतु ७२ वर्षांनी स्वप्नीलच्या पदकाने हा दुष्काळ संपला. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलवर स्वप्नील, त्याचे कुटुंबीय आणि त्याच्या प्रशिक्षक यांचे कौतुक केले.  

स्वप्नीलच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर महाराष्ट्र सरकारने त्याला १ कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली. पण, नेमबाजपटूला ही घोषणा वृत्तपत्रांमधूनच कळाली आणि त्याच्याशी सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याने संपर्क साधलेला नाही. अजूनही या पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत अधिकृत काहीच माहिती नाही. राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महाराष्ट्र सरकारचा स्वप्नीलसाठी मोठा प्लान असल्याचे सांगितलेले होते आणि सरकारी पद व "विशेष पॅकेज" ऑफर करण्याच्या योजनांचा उल्लेख केला होता, परंतु मीडियाने याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अनरिचेबल होते.  

स्वप्नील रेल्वेत नोकरी करतो आणि त्याला नियमित सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु ऑफरमधील अटींमुळे त्यांने नकार दिला. “ॲथलीटला नोकरीच्या पाच वर्षांनंतर किंवा वयाची ३० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ( यापैकी जे आधी येईल) नियमितपणे कार्यालयातून काम करावे लागेल. मी आधीच २९  वर्षांचा आहे  आणि नेमबाजीला माझे प्राधान्य आहे, म्हणून मी ते अर्ज न करण्याचा निर्णय घेतला,” असे स्वप्नीलने स्पष्ट केले.

स्वप्नीलचे वडील सुरेश यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटपटूंना मिळालेल्या झटपट बक्षीसांच्या तुलनेत राज्य सरकार तत्परता दाखवत नसल्याबद्दल निराशा व्यक्त केली. सुरेश यांनी ऑलिम्पिक पदकांसाठी नव्याने जाहीर केलेल्या रोख बक्षिसेमागील निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ७२  वर्षात महाराष्ट्राकडे फक्त दोनच पदके आहेत आणि खेळाडूंना समान वागणूक देण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT