India vs Spain hockey esakal
क्रीडा

Hockey Olympic 2024 IND vs ESP: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने जिंकलं कांस्यपदक; PR Sreejesh ची निवृत्ती

India vs Spain Hockey Match Olympic 2024 - पी आर श्रीजेश याच्या शेवटच्या ऑलिम्पिक सामन्यात भारतीय संघ त्याला पदकाची भेट देण्यासाठी सज्ज होते.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Hockey India vs Spain Live: भारतीय पुरुष हॉकी संघ यंदा सुवर्णपदकाला नक्की गवसणी घालेल, असा विश्वास उपांत्य फेरीच्या सामन्यात तुटला... जर्मनीविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या सेकंदापर्यंत प्रयत्न करूनही भारताला पराभव टाळता आला नाही. त्यामुळे टोकियोतील कांस्यपदक विजेत्या टीम इंडियाला पॅरिसमध्येही कांस्यपदकासाठी लढावे लागले आणि स्पेनविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने ( Harmanpreet Singh) दोन गोल करून भारताला विजय मिळवून दिला. भारताचा स्टार गोलरक्षक पी आर श्रीजेश ( PR Sreejesh) याचा हा कारकीर्दितील शेवटचा सामना होता आणि भारतीय खेळाडूंनी त्याला ऑलिम्पिक पदकाची भेट दिली.

आतापर्यंतचा प्रवास...

भारताने ब गटात ५ सामन्यांत ३ विजय मिळवले आणि प्रत्येकी १ सामन्यात हार व ड्रॉ असा निकाल लावला. भारताने उपांत्यपूर्व फेरीत रोमहर्षक लढतीत ग्रेट ब्रिटनवर पेनल्टी शूटऑऊटवर विजय मिळवला. पण, जर्मनीने उपांत्य फेरीत ३-२ अशा विजयासह भारताचे सुवर्ण स्वप्न भंग केले. सामन्याच्या अगदी शेवटच्या सेकंदात भारताला बरोबरीचा गोल करण्याची संधी मिळालेली, परंतु ती थोडक्यात गमावली. India vs Spain Hockey

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ...

india hockey bronze medal match भारतीय पुरूष हॉकी संघाने १९२८ ते १९५६ अशी सहा सुवर्णपदकं जिंकली होती. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर १९६४ व १९८० मध्ये भारताने पुन्हा सुवर्ण कामगिरी केली. १९६८, १९७२ व २०२० मध्ये भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारतीय संघाने ५२ वर्षांनंतर पुन्हा एकदा सलग दोन कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम आज करून दाखवला. या विजयानंतर पी आर श्रीजेशला सर्वांनी कुर्निसात केला. हरमनप्रीतने त्याला खांद्यावर उचलून घेतले.

पहिला क्वार्टर...

India vs Spain Hockey Score भारताकडून शेवटचा सामना खेळण्यासाठी उतरलेल्या पी आर श्रीजेशला पदकाची भेट देण्याचा निर्धार करूनच खेळाडू मैदानावर उतरले होते. सहाव्या मिनिटाला सुखजीत सिंगचा गोलसाठीचा प्रयत्न थोडक्यात हुकला, पण या प्रयत्नाने स्पेनच्या पोटात गोळा आणला होता. पण, तीन मिनिटांनी स्पेनच्या जोस बॅस्टेराचा गोलप्रयत्न श्रीजेशने हाणून पाडला. भारतीय खेळाडूंनी नंतर स्पेनवर दडपण टाकण्याचा खेळ केला आणि पहिल्या सत्रात वर्चस्व राखले.

पेनल्टी स्ट्रोक...

स्पेनला १८व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि त्यावर मार्क मिरालेसने गोल करून १-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर २१व्या मिनिटाला स्पेनने सलग दोन कॉर्नर मिळवले, परंतु हे गोल भारताला रोखता आले. स्पेनने दुसऱ्या क्वार्टरमध्ये खेळ कमालीचा उंचावलेला दिसला. २४व्या मिनिटाला ललित कुमार आणि हार्दिक यांनी बॅक टू बॅक गोलसाठी प्रयत्न केले, परंतु स्पेनचा गोलरक्षक सतर्क होता. २८व्या मिनिटाला बोर्या लॅकालेचा चेंडू पोस्टला लागला अन्यथा स्पेनची आघाडी दुप्पट झालीच असती. त्याचवेळी स्पेनने मिळालेला कॉर्नरही गमवला. ३०व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. हरमनप्रीतचा यंदाच्या ऑलिम्पिकमधील हा ९वा गोल ठरला.

हरमनप्रीतचा जलवा

भारतीय कर्णधाराने तिसऱ्या क्वार्टरच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताला सलग तीन कॉर्नर मिळाले, परंतु यावेळी हरमनप्रीतच्या वाट्याला यश नव्हते. ४०व्या मिनिटाला स्पेनसाठी जोकिन मेनिनिने बरोबरीचा गोल केला, परंतु भारताने या निर्णयाविरोधात रेफरर मागितला आणि स्पेनचा गोल नाकारण्यात आला. भारताकडून जोरदार आक्रमण सुरू झाले. अभिषेक व हरमनप्रीत यांनी तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला भारी खेळ केला.

शेवटची १५ मिनिटे

२-१ अशा आघाडीनंतर भारतीय संघाला शेवटच्या पंधरा मिनिटांत बचाव करून ही आघाडी कायम राखायची होती. पी आर श्रीजेशने अप्रतिम बचाव करून स्पेनला चकित केले. भारताचा बचाव जबरदस्त राहिला आणि स्पेनचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. सामना जसजसा पुढे सरकत होता, तशी उत्सुकता शिगेला पोहोचत होती. साडेतीन मिनिटे शिल्लक असताना स्पेनने गोलरक्षक हटवला आणि एक अधिकच्या आक्रमणपटूसह बरोबरीसाठी जोर लावला. दीड मिनिटं असताना स्पेनने पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि श्रीजेशने पुन्हा एकदा अद्भुत बचाव केला. भारताला शेवटची ६० सेकंद ही आघाडी टिकवायची होती आणि स्पेनने ४४ सेकंद शिल्लक असताना पुन्हा कॉर्नर मिळवला.

चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीतकडून स्पेनचा खेळाडू पडला आणि स्पेनने स्ट्रोकची मागणी केली. पण, ती नाकारली गेल आणि कॉर्नर कायम ठेवला. भारताने हा सामना २-१ असा जिंकून कांस्यपदक नावावर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: अगं बाळे, घाबरून कसं चालेल? लेकीच्या काळजीने अजितदादा कसे गलबलले; सुनेत्रा पवारांनी सांगितला अनुभव

Latest Maharashtra News Updates : शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

Ola Electric Stock Crash: ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला, काय कारण आहे?

संकटासमोर सलमान पाय रोवून... सीमा सजदेहने केलं दीराचं कौतुक, म्हणाली- मलायकाच्या वडिलांच्या निधनावेळी तो

Congress Candidates: विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, विद्यमान आमदाराचे कापले तिकीट; जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT