Zohaib Rasheed  esakal
क्रीडा

Pakistan Boxer : ऑलिम्पिक पात्रता राहिली बाजूला पाकिस्तानी बॉक्सर आपल्याच संघातील खेळाडूचे पैसे चोरून पसार

Pakistan Boxer News : पाकिस्तानचे बॉक्सर इटलीत ऑलिम्पिक पात्रता फेरी खेळण्यासाठी गेले होते. मात्र जोहैब राशीदने आपल्या संघातील खेळाडूचे पैसे चोरले अन् पसार झाला.

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Boxer News Italy : पाकिस्तानचे बॉक्सर सध्या इटलीत ऑलिम्पिक पात्रता फेरी खेळण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यातीलच एका बॉक्सरने वेगळाच प्रताप केला. जोहैब राशीद नावाच्या बॉक्सरने आपल्या संघातील दुसऱ्या खेळाडूचे पैसे चोरून पोबारा केला आहे. ही माहिती खुद्द पाकिस्तान अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनने दिली आहे.

फेडरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी हा प्रकार इटलीतील पाकिस्तानी दूतावासाच्या निदर्शनास आणून दिला आहे आणि या घटनेबाबत पोलिस अहवालही दाखल केला.

राष्ट्रीय महासंघाचे सचिव कर्नल नासिर अहमद म्हणाले, "जोहैब रशीद ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाच सदस्यीय संघाचा एक भाग म्हणून तेथे गेला होता. मात्र घडलेला प्रकार हा बॉक्सिंग फेडरेशन आणि देशासाठी हे अत्यंत लाजिरवाणा आहे. जोहैबने गेल्या वर्षीच्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि त्याला पाकिस्तानमधील एक उगवती तारा म्हणून ओळखले जात होते.

नासिरने सांगितले की, 'महिला बॉक्सर लॉरा इकराम प्रशिक्षणासाठी बाहेर गेली होती आणि हॉटेलमधून गायब होण्यापूर्वी जोहैबने समोरच्या डेस्कवरून तिच्या खोलीच्या चाव्या घेतल्या आणि पर्समधून तिचे विदेशी चलन चोरले.'

नासिर पुढे म्हणाले की, 'पोलिसांना कळवण्यात आले आहे आणि ते आता त्याचा शोध घेत आहेत पण तो कोणाच्याही संपर्कात नाही,' एखाद्या पाकिस्तानी खेळाडूने राष्ट्रीय पथकासह परदेशात जाण्याची आणि चांगल्या भविष्याच्या आशेने बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

(Sports Latest News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT