अध्यक्ष बृजभूषण सिंह  sakal
क्रीडा

Olympics : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्यांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील कुस्ती हे क्षेत्र गेल्या काही महिन्यांपासून राजकारणाने ढवळून निघाले आहे. कुस्तीपटूंच्या भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर देशामध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून या प्रकरणाचा अहवाल सर्वांसमोर आणला नसला तरी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची दखल घेतली जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे अभिनव बिंद्रा व नीरज चोप्रा या खेळाडूंनी जंतरमंतर येथे आंदोलन करीत असलेल्या कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला असून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी त्यांच्याकडून आवाहनही करण्यात आले आहे.

अभिनव बिंद्रा याने सोशल माध्यमावर या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘‘भारतीय कुस्तीपटूंनी संघटनेच्या व्यवस्थापनावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ज्या खेळाडूंवर अन्याय झाला आहे, मी त्यांच्यासोबत आहे. एक खेळाडू देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी दररोज जीवाचे रान करतो.

अशावेळी खेळाडूंना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुस्तीशी संबंधित प्रकरण निष्पक्ष व वैयक्तिकपणे हाताळले जायला हवे. खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरण तयार केल्यास त्यांची प्रगती होऊ शकेल.’’ टोकियो ऑलिंपिकमधील भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचणारा नीरज चोप्रा यानेही कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे.

सोशल माध्यमावर त्याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, एक देशातील प्रत्येक व्यक्ती ही खेळाडू असो वा नसो, त्याची अखंडता आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कुस्तीपटू आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ही घटना हृदयाला चटका लावणारी आहे. कुस्तीपटूंसोबत जे घडत आहे ते कधीही घडायला नको, असे त्याने परखडपणे नमूद केले.

पुढे तो म्हणाला, हा एक संवेदनशील मुद्दा आहे. तो निःपक्षपाती आणि पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि कुस्तीपटूंना न्याय मिळावा, अशी इच्छाही त्याने बोलून दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT