five Maharashtra athletes sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: महाराष्ट्राचे ५ खेळाडू ऑलिम्पिक खेळणार; आपल्यापेक्षा लहान राज्य 'दादागिरी' करणार!

List of Paris Olympic 2024 Players by their states: भारताचा ११७ खेळाडूंचा ताफा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. या खेळाडूंची राज्यानुसार वर्गवारी केल्यास महाराष्ट्रापेक्षा लहान राज्यांचे वर्चस्व पाहायला मिळतेय.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 India's 117-member contingent devided across states and UTs - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास अवघे ३ दिवस शिल्लक राहिली आहेत. २६ जुलैला पॅरिसमध्ये भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे आणि या स्पर्धेत भारताकडून ११७ खेळाडू सहभागी होणार आहेत. २०२१ मध्ये टोक्योत पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ७ पदकं जिंकली होती. भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.

पॅरिसमध्येही नीरज या सुवर्ण कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी सर्वांना खात्री आहे. त्याच्याशिवाय पी व्ही सिंधू, लव्हलिना बोर्गोहेन, अचंथा शरथ कमल आणि मनू भाकर यांच्याकडूनही पदकांची अपेक्षा आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या ११७ खेळाडूंची राज्यनिहाय वर्गवारी केल्या, त्यात हरयाणा, पंजाब व तामिळनाडू या राज्यांतील संख्या अधिक दिसेल. महाराष्ट्राचे फक्त पाच खेळाडू यंदा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणार आहेत.

आसाम (१)

लोव्हलिना बोर्गोहेन - बॉक्सिंग (महिला ७० किलो)

बिहार (१)

श्रेयसी सिंग - नेमबाजी

चंदीगड (२)

अर्जुन बबुता - नेमबाजी ( १० मीटर एअर रायफल, १० मीटर एअर रायफल मिश्र संघ)

विजयवीर सिद्धू - नेमबाजी ( २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल)

दिल्ली (४)

अमोज जेकब - ऍथलेटिक्स ( ४ बाय ४०० मीटर रिले)

तुलिका मान - ज्युदो (महिला +७८ किलो)

राजेश्वरी कुमारी - नेमबाजी

मनिका बत्रा - टेबल टेनिस (महिला एकेरी )

गोवा (१)

तनिषा क्रास्टो - बॅडमिंटन (महिला दुहेरी)

गुजरात (२)

हरमीत देसाई - टेबल टेनिस (पुरुष एकेरी, सांघिक)

मानव ठक्कर - टेबल टेनिस (पुरुष संघ)

हरियाणा (२४)

भजन कौर - तिरंदाजी (महिला वैयक्तिक, संघ)

किरण पहल - ऍथलेटिक्स (महिला ४०० मी, ४x४०० मी रिले)

नीरज चोप्रा - ऍथलेटिक्स (पुरुष भालाफेक)

अमित पंघल - बॉक्सिंग (पुरुष ५१ किलो)

जैस्मिन लॅम्बोरिया - बॉक्सिंग (महिला ५७ किलो)

निशांत देव - बॉक्सिंग (पुरुष ७१ किलो)

प्रीती पवार - बॉक्सिंग (महिला ५४ किलो)

दीक्षा डागर - गोल्फ (महिला वैयक्तिक)

संजय, सुमित - पुरुष हॉकी संघ

बलराज पनवार - रोईंग (पुरुष एकल स्कल्स)

अनिश भानवाला - नेमबाजी ( २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल)

मनू भाकर - नेमबाजी ( १० मीटर एअर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ, महिला २५ मीटर पिस्तूल)

रमिता जिंदाल - नेमबाजी ( १० मीटर एअर रायफल, १० मीटर एअर रायफल मिश्र संघ)

रायझा ढिल्लन - नेमबाजी ( स्कीट)

रिदम सांगवान - नेमबाजी ( १० मीटर एअर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ)

सरबज्योत सिंग - नेमबाजी ( १० मीटर एअर पिस्तुल, १० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ)

सुमित नागल - टेनिस (पुरुष एकेरी)

अमन सेहरावत - कुस्ती (पुरुष फ्रीस्टाइल ५७ किलो)

अंशू मलिक - कुस्ती (महिला ५७ किलो)

अंतीम पंघल - कुस्ती (महिला ५३ किलो)

निशा दहिया - कुस्ती (महिला ६८ किलो)

रितिका हुडा - कुस्ती (महिला ७६ किलो)

विनेश फोगट - कुस्ती (महिला ५० किलो)

झारखंड (१)

दीपिका कुमारी - तिरंदाजी (महिला वैयक्तिक, महिला संघ)

कर्नाटक (७)

पूवम्मा एमआर - ऍथलेटिक्स (महिला ४ बाय ४००मीटर रिले)

अश्विनी पोनप्पा - बॅडमिंटन (महिला दुहेरी)

अदिती अशोक - गोल्फ (महिला वैयक्तिक)

श्रीहरी नटराज - जलतरण (पुरुष १००मीटर बॅकस्ट्रोक)

धिनिधी देसिंघु - जलतरण (महिला २०० मीटर फ्रीस्टाइल)

अर्चना कामथ - टेबल टेनिस (महिला संघ)

रोहन बोपण्णा - टेनिस (पुरुष दुहेरी)

केरळ ( ६)

अब्दुल्ला अबोबकर - ऍथलेटिक्स (पुरुष तिहेरी उडी)

मोहम्मद अजमल - ॲथलेटिक्स (पुरुषांची ४ बाय ४०० मीटर रिले)

मोहम्मद अनस - ऍथलेटिक्स (पुरुषांची ४बाय ४०० मीटर रिले)

मिजो चाको कुरियन - ऍथलेटिक्स (राखीव)

पीआर श्रीजेश - पुरुष हॉकी संघ

एचएस प्रणॉय - बॅडमिंटन (पुरुष एकेरी)

मध्य प्रदेश (२)

विवेक सागर प्रसाद - पुरुष हॉकी संघ

ऐश्वरी प्रताप सिंग तोमर - नेमबाजी (पुरुषांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन)

महाराष्ट्र (५)

प्रवीण जाधव - तिरंदाजी (पुरुष वैयक्तिक, पुरुष संघ)

अविनाश साबळे - ऍथलेटिक्स (पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस)

सर्वेश कुशारे - ऍथलेटिक्स (पुरुष उंच उडी)

चिराग शेट्टी - बॅडमिंटन (पुरुष दुहेरी)

स्वप्नील कुसाळे - नेमबाजी (पुरुषांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन)

मणिपूर (२)

मीराबाई चानू - वेटलिफ्टिंग (महिला ४९ किलो)

नीलकांत शर्मा - पुरुष हॉकी संघ (राखीव)

ओडिशा (२)

अमित रोहिदास - पुरुष हॉकी संघ

किशोर जेना - ऍथलेटिक्स (पुरुष भालाफेक)

पंजाब (१९)

अक्षदीप सिंग - ऍथलेटिक्स (पुरुषांची २० किमी शर्यत चालणे)

तजिंदरपाल सिंग तूर - ऍथलेटिक्स (पुरुष शॉटपुट)

विकास सिंग - ऍथलेटिक्स (पुरुषांची २० किमी शर्यत चालणे)

गगनजीत भुल्लर - गोल्फ (पुरुष वैयक्तिक)

गुरजंत सिंग, हार्दिक सिंग, हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, जुगराज सिंग,कृष्ण बहादूर पाठक, मनदीप सिंग, मनप्रीत सिंग, समशेर सिंग, सुखजीत सिंग ( पुरुष हॉकी संघ)

अंजुम मौदगिल - नेमबाजी (महिला ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स)

अर्जुन चीमा - नेमबाजी (पुरुष १० मीटर एअर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ)

सिफ्ट कौर समरा - नेमबाजी (महिला ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स)

संदीप सिंग - नेमबाजी (पुरुषांची १० मीटर एअर रायफल, १० मीटर एअर रायफल मिश्र संघ)

प्राची चौधरी कालियार- ऍथलेटिक्स (राखीव)

राजस्थान (२)

अनंतजीत सिंग नारुका - नेमबाजी (पुरुष स्कीट, स्कीट मिश्र संघ)

माहेश्वरी चौहान - नेमबाजी (महिला स्कीट आणि स्कीट मिश्रित संघ)

तामिळनाडू (१३)

जेस्विन आल्ड्रिन - ऍथलेटिक्स (पुरुषांची लांब उडी)

प्रवील चित्रवेल - ऍथलेटिक्स (पुरुष तिहेरी उडी)

राजेश रमेश - ऍथलेटिक्स (पुरुष ४ बाय ४०० मीटर रिले)

संतोष तमिलरासन - ऍथलेटिक्स (पुरुष ४ बाय ४०० मीटर रिले)

सुभा व्यंकटेशन - ऍथलेटिक्स (महिला ४x४०० मी रिले)

विथ्या रामराज - ऍथलेटिक्स (महिला ४x४०० मीटर रिले)

नेत्रा कुमनन - नौकानयन (महिलांची एक व्यक्ती डिंगी)

विष्णू सरवणन - नौकानयन (पुरुषांची एक व्यक्ती डिंगी)

इलावेनिल वालारिवन - नेमबाजी (महिलांची १० मीटर एअर रायफल, १० मीटर एअर रायफल मिश्र संघ)

पृथ्वीराज तोंडाईमन - नेमबाजी

साथियान ज्ञानसेकरन - टेबल टेनिस (राखीव)

शरथ कमल - टेबल टेनिस (पुरुष एकेरी, संघ)

एन श्रीराम बालाजी - टेनिस (पुरुष दुहेरी)

तेलंगाणा (४)

पीव्ही सिंधू - बॅडमिंटन (महिला एकेरी)

निखत जरीन - बॉक्सिंग (महिला ५० किलो)

ईशा सिंग - नेमबाजी (महिला २५ मीटर पिस्तूल)

श्रीजा अकुला - टेबल टेनिस (महिला एकेरी, संघ)

उत्तराखंड (४)

अंकिता ध्यानी - ऍथलेटिक्स (महिला ५००० मी)

परमजीत बिष्ट - ऍथलेटिक्स (पुरुषांची २० किमी शर्यत चालणे)

सूरज पनवार - ऍथलेटिक्स (मॅरेथॉन शर्यत वॉक मिश्र रिले)

लक्ष्य सेन - बॅडमिंटन (पुरुष एकेरी)

उत्तर प्रदेश (७)

अन्नू राणी - ऍथलेटिक्स (महिला भालाफेक)

पारुल चौधरी - ऍथलेटिक्स (महिला ३००० मी स्टीपलचेस, महिला ५००० मी)

प्रियांका गोस्वामी - ऍथलेटिक्स (महिलांची २० किमी रेस वॉक, मॅरेथॉन रेस वॉक मिश्र रिले)

राम बाबू - ऍथलेटिक्स (पुरुषांची २० किमी शर्यत चालणे)

शुभंकर शर्मा - गोल्फ (पुरुष वैयक्तिक)

ललित कुमार उपाध्याय, राजकुमार पाल - पुरुष हॉकी संघ

पश्चिम बंगाल (३)

अंकिता भकत - तिरंदाजी (महिला वैयक्तिक, महिला संघ)

अनुष अग्रवाला - घोडेस्वार (ड्रेसेज इव्हेंट)

अहिका मुखर्जी - टेबल टेनिस (राखीव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT