Pakistan vs Australia, 3rd Test : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना लाहोरच्या मैदानात सुरु आहे. गद्दाफी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 268 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवातही केली. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने बिन बाद 11 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 134 धावांची आघाडी घेतली आहे. उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) 7 (12) आणि डेविड वॉर्नर (David Warner) 4 (6) नाबाद खेळत होते.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेविड वॉर्नर (David Warner ) आणि शाहिन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) यांचा ड्रामा पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या दिवशी अखेरची ओव्हर ही शाहिन शाह आफ्रिदी टाकत होता. दुसऱ्या बाजूला वॉर्नर खेळत होता. अखेरचा चेंडू आफ्रिदीनं बाउन्सर मारला.
ऑस्ट्रेलियन सलामीवीराने संयमीरित्या हा चेंडू खेळून काढला. चेंडू फेकल्यानंतर आफ्रिदी चक्क वॉर्नरला भिडतानाचे चित्र पाहायला मिळाले. आफ्रिदी डोळ्यात डोळे घालून बघत असताना वॉर्नरने विनोदी अंदाजात रिप्लाय दिला. त्यानंतर रागारागाने वॉर्नरकडे पाहणारा आफ्रिदीच्या चेहऱ्यावरही हसू फुलले. वॉर्नरने हसत हसत आफ्रिदीची पाठही थोपटली. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण यावर कमेंट्स करताना दिसते.
पाकिस्तान संघाकडून पहिल्या डावात अब्दुल्लाह शफीकने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय अजर अलीने 78 आणि कर्णधार बाबर आझम याने 67 धावांची खेळी केली. फवाद आलमने 13 धावांचे योगदा दिले. कमिन्सने पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत धाडला. त्याला दुसऱ्या बाजूनं मिचेल स्टार्कची सुरेख साथ मिळाली. स्टार्कने 33 धावा खर्च करुन 4 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा संघ या सामन्यात 3 बाद 248 धावांसह सुस्थितीत होता. मात्र ऑस्ट्रेलियन संघाने दमदार कमबॅक करत अवघ्या 20 धावांत 7 विकेट्स मिळवत पाकिस्तानचा पहिला डाव 268 धावांत आटोपला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.