न्यूझीलंड क्रिकेट संघ 18 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये गेला. पण सुरक्षिततेच कारणास्तव त्यांना मालिका रद्द करण्याच निर्णय घेतला. आयत्यावेळी न्यूझीलंडने घेतलेल्या निर्णयाचा पाकिस्तान क्रिकेटला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आजी-माजी पाकिस्तानी क्रिकेटर न्यूझीलंडवर बरसताना दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नव-नियुक्त अध्यक्ष रमीझ राजा, विद्यमान कर्णधार बाबर आझम आणि माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनंतर आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं न्यूझीलंडवर निशाणा साधला आहे.
तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केलाय का? असा संतप्त प्रश्न आफ्रिदीने न्यूझीलंडला विचारला आहे. शाहिद आफ्रिदीने ट्विटच्या माध्यमातून या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे. एक खोटी धमकी मिळाल्यानंतर तुम्ही दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेची हमी दिली असताना त्यासंदर्भात सर्व चाचपणी केली असताना तुम्ही न खेळण्याचा निर्णय घेतलाय. याचे क्रिकेटवर काय परिणाम होतील, याची कल्पना आहे का? असा प्रश्न आफ्रिदीनं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला विचारला आहे.
न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना 17 सप्टेंबरला रंगणार होता. सामन्याला तासाभराचा अवधी असताना न्यूझीलंडने मालिका रद्द झाल्याची घोषणा केली. दुसऱ्या बाजूला पाकिस्ताने सामना स्थगित झाल्याचे म्हटले होते.
2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. लाहोरमध्ये झालेल्या या घटनेनंतर कोणताही संघ पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास तयार नव्हता. परिणामी पाकिस्तानला आपल्या घरच्या मैदानातील सर्व सामने हे युएईतील अबूधाबी, शारजा आणि दुबईच्या मैदानात घ्यावे लागले. 2017 मध्ये पाकिस्तान सुपर लीग आणि त्यानंतर वर्ल्ड इलेव्हन संघातून अनेक देशातील स्टार खेळाडू पाकिस्तामध्ये जाऊन खेळताना दिसले. ऑक्टोबरमध्य श्रींलकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला. 2018 मध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा दौरा केला आणि पाकिस्तान क्रिकेटला पुन्हा अच्छे दिन येत असल्याची चाहूल मिळाली. पण आता न्यूझीलंडने सुरक्षिततेच्या कारणास्तव माघार घेतल्याने इतर देश पाकिस्तान दौऱ्यासंदर्भात काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.