Sri Lanka Vs Pakistan 2nd Test : पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्धचा दुसरा कसोटी सामना अवघ्या चार दिवसात जिंकत यजमानांना व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानने श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
पाकिस्तानने पहिल्या डावात श्रीलंकेला 166 धावात गुंडाळले होते. त्यानंतर आपला पहिला डाव 5 बाद 576 धावांवर घोषित केला. यानंतर 410 धावांची आघाडी घेतल्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 188 धावात संपवला.
विशेष म्हणजे पाकिस्तानचा हा श्रीलंकेतील 5 वा कसोटी विजय आहे. श्रीलंकेत 5 कसोटी मालिका जिंकणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ आहे. यापूर्वी क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणे इतर कोणत्याही संघाला जमलेले नाही. पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2 - 0 अशी जिंकत WTC25 गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.अ
दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानने आपला पहिला डाव 5 बाद 576 धावांवर घोषित केला. मोहम्मद रिझवानचे अर्धशतक झाल्यानंतर बाबर आझमने आपला डाव घोषित केला. पाकिस्तानकडून सलामीवीर शफिकने 201 धावांची द्विशतकी खेळी केली. त्यानंतर आगा सलमानने देखील 132 धावांची आक्रमक खेळी करत पाकिस्तानला 500 धावांच्या पार पोहचवले. (Sri Lanka Vs Pakistan Test Series)
पाकिस्तानने आपला पहिला डाव 572 धावांवर घोषित केल्यानंतर त्यांना पहिल्या डावात 410 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर पाक गोलंदाजांनी यजमान श्रीलंकेचा दुसरा डाव 188 धावातच संपुष्टात आणला. (WTC 2023 - 2025 Point Table)
पाकिस्तानकडून अनुभवी डावखुरा फिरकीपटू नोमन अलीने 70 धावात तब्बल 7 विकेट्स घेतल्या. त्याला नसीम शाहने 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने एकाकी झुंज देत नाबाद 63 धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.