Arshad Nadeem and Neeraj chopra 
क्रीडा

Neeraj chopra : 'इंशाअल्लाह ऑलिम्पिकमध्येही आपण १ अन् २...', पाकिस्तानच्या भालापटूचा नीरजसाठी भाईचारा

Kiran Mahanavar

Arshad Nadeem and Neeraj chopra : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने बुडापेस्ट येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत 88.17 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. पहिल्या फेरीत फाऊल झाल्यानंतर नीरजने दुसऱ्या फेरीत सुवर्ण थ्रो केला.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसरे स्थान पटकावले. या रोमांचक लढतीनंतर पाकिस्तानी खेळाडूने नीरजचे अभिनंदन केले आणि 2024 मध्ये पॅरिसमध्येही हे दोघे प्रथम आणि द्वितीय स्थान मिळवतील अशी आशा त्याने व्यक्त केली.

अर्शद नदीम रौप्यपदक जिंकल्या म्हणाला की, मी नीरज भाईसाठी खूप आनंदी आहे. भारत आणि पाकिस्तान या खेळात जगात एक आणि दोन नंबरवर आहेत. इंशाअल्लाह ऑलिम्पिकमध्येही आम्ही एक आणि दोन असू. अर्शद नदीमने नेहमीच नीरजचे कौतुक केले आहे.

3 भारतीय खेळाडूंनी टॉप 6 मध्ये स्थान मिळवले, ज्यामध्ये किशोर जेना (84.77 मी) आणि डीपी मनू (84.14 मी) अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. यापूर्वी कधीही 3 भारतीयांनी जागतिक स्पर्धेत कोणत्याही स्पर्धेत पहिल्या आठमध्ये स्थान मिळवले नव्हते.

25 वर्षीय चोप्राने सुरुवातीला फाऊल केले पण नंतर त्याने 88.17 मीटर, 86.32 मीटर, 84.64 मीटर, 87.73 मीटर आणि 83.98 मीटर असे थ्रो केले. पाकिस्तानच्या राष्ट्रकुल चॅम्पियन अर्शद नदीमने हंगामातील सर्वोत्कृष्ट 87.82 मीटर थ्रो करून रौप्यपदक जिंकले, तर चेक प्रजासत्ताकच्या याबुकने कांस्यपदक जिंकले.

एकाच वेळी ऑलिम्पिक आणि जागतिक विजेतेपद पटकावणारा नीरज चोप्रा अभिनव बिंद्रा नंतर दुसरा भारतीय बनला आहे. बिंद्राने वयाच्या 23 व्या वर्षी जागतिक विजेतेपद आणि वयाच्या 25व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये कांस्यपदक तर नीरज चोप्राने गेल्या वर्षी रौप्यपदक जिंकले होते. या सुवर्णासह नीरज चोप्राने सर्व स्पर्धांमध्ये (ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, डायमंड लीग) सुवर्णपदके जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT