Pakistan Cricket Board to challenge IPL proposed extended window at ICC meet Says Ramiz Raja esakal
क्रीडा

ICC FTP : आयपीएलसाठी मोठी विंडो देण्याला पाक बोर्ड देणार आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयपीएलला आयसीसी वेळापत्रकात अडीच महिन्याची विंडो देण्याचा प्रस्ताव आला तर त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी संचालक रमीझ राजा यांनी याबाबत आयसीसीच्या पुढच्या बैठकीवेळी आवाज उठवला जाईल. (Pakistan Cricket Board to challenge IPL proposed extended window at ICC meet Says Ramiz Raja)

रमीझ राजा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आतापर्यंत आयपीएलची विंडो वाढवून देण्याबाबत कोणतीही घोषणा किंवा निर्णय झालेला नाही. याबाबत मी आयसीसी बैठकीवेळी माझे मत व्यक्त करणार आहे. माझे मत अगदी स्पष्ट आहे. 'जागतिक क्रिकेटमध्ये जर असा निर्णय झाला तर याचा अर्थ आपल्याला कमी पैसा मिळणार. याला आम्ही नक्कीच सर्व शक्तीनिशी आव्हान देणार, आयसीसीमध्ये आमचे म्हणणे सक्षमपणे मांडणार.'

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले होते की भारतीय बोर्डाला आयसीसीच्या पुढच्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये आयपीएलची विंडो वाढवून मिळेल असे वक्तव्य केले होते. आयसीसीचे पुढचा फ्युचर टूर प्रोग्राम हा 2024 ते 2031 पर्यंतचा असणार आहे.

शहा म्हणाले होते की, 'पुढच्या एफटीपी सायकलमध्ये आयपीएलला अधिकृतरित्या अडीच महिन्याची विंडो मिळेल. यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्यात अडचण येणार नाही. आम्ही याबाबत विविध क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्याशी चर्चा करणार आहोत.'

दरम्यान, रमीझ राजा यांनी पाकिस्तान भारताबरोबर खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'मी सौरभ गांगुली बरोबर याबाबत चर्चा केली असून मी त्याला म्हणालो की तीन माजी क्रिकेटपटू त्यांच्या क्रिकेट बोर्डाचे सर्वोच्च पद भुषवत आहेत. ते जर बदल घडवून आणू शकणार नसतील तर कोण बदल घडवणार?'

ते पुढे म्हणाले की, 'गेल्यावर्षी आणि या वर्षी असं दोनवेळा सौरभ गांगुलीने मला आयपीएल फायनल पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. क्रिकेटच्या दृष्टीकोणातून त्यात काही गैर नव्हते. मात्र जी परिस्थिती आहे त्यात चाहत्यांचा रोष पत्करावा लागला असता त्यामुळे हे आमंत्रण स्विकारण्याबाबत विचार करावा लागतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT