Pakistan Cricket Team World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 मधील भारत पाकिस्तान सामन्यात मायदेशात खेळणाऱ्या भारताने पाकला 7 विकेट्सनी मात दिली. या विजयासोबतच भारताने वनडे वर्ल्डकपमधील पाकिस्तानवरचा आठवा विजय साजरा केला. भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघ निराशेच्या गर्तेत अडकला आहे. त्यात त्यांच्यासाठी अजून एक वाईट बातमी आली आहे.
पाकिस्तान संघातील एक, दोन नाही तर तीन खेळाडू तापाने फणफणले आहेत. अब्दुल्ला शफिक, शाहीन आफ्रिदी आणि उसमा मीर यांना ताप आला आहे.
अहमदाबादमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ सोमवारी बंगळुरू येथे दाखल झाला. त्यांचा सामना आता बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणार आहे. मात्र त्याच्या सरावावेळीच संघातील तीन खेळाडू आजारी पडल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
पाकिस्तान संघाचे माध्यम व्यवस्थापक यांनी क्रिकेट पाकिस्तानला सांगितले की, 'काही खेळाडू गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी आहेत. काही खेळाडू पूर्णपणे बरे झाले आहेत. जे अजून बरे झालेले नाहीत ते वैद्यकीय पथाकाच्या देखरेखीखाली आहेत.'
पाकिस्तानच्या कळपात तापाची लाटच आली आहे. संघाने डेंग्यू आणि कोरोनाची चाचणी देखील करून घेतली. बंगळुरूमध्ये देखील संघाची सातत्याने डेंग्यू आणि कोरोनाची चाचणी होत आहे.
पाकिस्तानने खेळाडू आजापणातून लवकर सावरावेत यासाठी सराव सत्र देखील रद्द केलं आहे. मंगळवारी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान उपलब्ध खेळाडूंसाठी सराव सत्राचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.